हवामान अंदाज : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होणार, IMD ने दिला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हवामान अंदाज : पावसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. बऱ्याच ठिकाणी म्हणावा असा पाऊस (rain) झाला नाही त्यामुळे यावर्षी दुष्काळ पडतो की काय अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. आता यामध्येच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. 18 जुलैच्या सुमारास चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे याचा परिणाम हा राज्यातील पावसाच्या स्थितीवर देखील होणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. 18 ते 20 जुलैदरम्यान गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा देखील दिला आहे.

पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज कोकण आणि विदर्भात काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भात देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Havaman Andaj)

दरम्यान, आज पुण्यात देखील पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बऱ्याच ठिकाणी खूप कमी पावसाची नोंदणी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील रखडल्या आहेत. मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये ही त्रुटी भरून निघेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

‘या’ ठिकाणी पाहा ताजा हवामान अंदाज

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजचा ताजा हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअरवर जा आणि आपले Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही रोजच्या रोज हवामान अंदाज पाहू शकता तो ही अगदी मोफत. त्याचबरोबर तुम्ही सरकारी योजना, बाजारभाव, जमीन मोजणी, पशूंची खरेदी विक्री इत्यादी गोष्टींची माहिती मोफत पाहू शकता. त्यामुळे लगेचच Hello Krushi हे अँप डाउनलोड करा.

error: Content is protected !!