Havaman Andaj : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अजून वाढणार, पेरणीला वेग येणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Havaman Andaj : राज्यात काही भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण अजून बऱ्याच भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने काही भागात अद्याप पेरण्या खोळंबल्या आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पेरण्या करण्यात आल्या आहेत अशा ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे पावसाची गरज आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Havaman Andaj )

मुंबई, ठाणे, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्ह्यापूर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यामधील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण जर पाऊस जर चांगला पडला तर पेरणी लवकरात लवकर पूर्ण होते म्हणून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या ठिकाणी पाहा हवामान अंदाज –

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला रोजचा हवामान अंदाज पाहायचा असेल तर प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही रोजचा हवामान अंदाज चेक करू शकता त्याचाबरोबर बाजारभाव, सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, इत्यादी गोष्टींची माहिती तुम्हाला या अँप मध्ये अगदी मोफत मिळेल. त्यामुळे लेगच प्ले स्टोअरवर जाऊन हे अँप डाउनलोड करा.

error: Content is protected !!