हवामान अंदाज : आज कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस? हवामान विभागाने जारी केला अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हवामान अंदाज : ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा एकदा राज्यात सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आता श्रावण सरी कोसळत आहेत. मुसळधार पाऊस नसला तरी राज्याच्या अनेक भागात रिमझिम स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अनेक दिवस शेतकरी पावसाची वाट पाहत होते. सध्या रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे.

तुमच्या गावात कधी पाऊस पडणार

तुम्हाला जर तुमच्या गावांमध्ये कधी पाऊस पडणार याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर प्ले स्टोअर वर जा आणिHello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा या ॲपच्या माध्यमातून तुम्ही रोजचा रोज हवामान अंदाज चेक करू शकता त्याचबरोबर घराबाहेर पडण्याआधी तुमच्या गावांमध्ये किती पाऊस पडणार याबाबतची देखील तुम्हाला अचूक माहिती मिळेल. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

दरम्यान, आज हवामान विभागाने विदर्भामध्ये पावसाचा ऑरेंज आणि काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात 25 ऑगस्ट पर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज देखील पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस कोसळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची अपेक्षा आहे कारण अजूनही बऱ्याच ठिकाणी नदी नाले कोरडेच आहेत.

राज्यातील चंद्रपूर आणि नागपूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट रविवारी दिला आहे. या भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर गोंदिया, अमरावती, वाशिम, अकोला, गडचिरोली आणि यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जाहीर करण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये नांदेड, जालना, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील अलर्ट जरी करण्यात आला आहे. तर संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोमवारसाठी हवामान विभागाने अलर्ट जरी केला आहे.

बंगालच्या उपसागरात बदल

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर पूर्व बंगालच्या उपसागरात मोठे बदल झाले असून या भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे यामुळे राज्यांमध्ये विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तसेच मराठवाडा या ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत तसेच हा पाऊस पुढील पाच दिवस पडेल असा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!