हवामान अंदाज : पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे, ढगफुटीसारखा पाऊस पडणार; IMD ‘या’ जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हवामान अंदाज : राज्यात मागील आठवड्यापासून मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्याने पावसामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या राज्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी भूस्खलनसुद्धा झाले आहे. आता पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे असल्याचे IMD ने आपल्या हवामान अंदाजात सांगितले आहे. राज्यात काही भागात ढगफुटीसारखा पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

IMD ने जारी केला सेटलाईट फोटो

राज्यातील पूर्व विदर्भासह मराठवाड्यातील कहाणी भागात आज सकाळी ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांत भाग बदलत पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हवामान अभ्यासक के एस होसाळीकर यांनी सॅटेलाईटने काढलेले एक छायाचित्र आपल्या ट्विट अकाउनवरून प्रसिद्ध केले असून यानुसार IMD ने विदर्भात आज पावसाचा अंदाज सांगितला आहे.

कोकणासाठी पुढील ४८ तास धोक्याचे (Konkan Rain News)

पुढील ४८ तास कोकणासाठी धोक्याचे असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पालघर व पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. राज्यात तीव्र मान्सून सक्रिय असल्यामुळे पुढील आठवडाभर सर्वदूर पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिल्यामुळे भोर- महाड वरंधा घाट बंद करण्यात आला आहे. घाटामध्ये अतिवृष्टी होऊन दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे, अशा घटना घडत आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

महाबळेश्वर येथे ६६५ मि.मी. पाऊस

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे तीन दिवसात ६६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोयना धरण परिसरातही मुसळधार पाऊस सुरु असून पाणीपातळीत वाढ झाली आहे. सातारा जिल्हाधिकारी दुडी यांनी खबरदारी म्हणून पाटण तालुक्यातील दरडप्रवण क्षेत्राला भेटी देऊन गावकऱ्यांना तात्पुरते अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.

भात लावणीचे काम संथ गतीने

नाशिकच्या सुरगाणा भागात भात लावणीचे काम संथ गतीने सुरू आहे. या भागात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत भात लागण बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे.

पंजाबराव डख हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj)

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात २३ ते २५ जुलै दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता आहे. हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तसेच २८, २९ जुलै आणि १ ऑगस्ट दरम्यान पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता आहे. यावर्षी दुष्काळ पडणार नाही, चांगला पाऊस पडणार आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यास शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती दिली जाईल, असे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

कोणत्या जिल्ह्यांना रेड, ओरँज अलर्ट जारी?

अति जोरदार पावसाचा अंदाज असलेले जिल्हे (रेड अलर्ट) : पालघर, पुणे.
जोरदार पावसाचा अंदाज असलेले जिल्हे (ऑरेंज अलर्ट) : ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम.
जोरदार तसेच विजांसह पावसाचा अंदाज असलेले जिल्हे (येलो अलर्ट) : सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ.

मुंबईत १७० मिलीमीटर पावसाची नोंद

कोकणासह मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले असून मागील २४ तासांत मुंबईत १२० मिलीमीटर ते १७० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पहिल्या पावसातच मुंबईतील अनेक रस्ते तुंबून मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर आता पालिका प्रशासनाने वेगाने पावले उचलत रस्त्यांवर पाणी साचणार नाही यासाठी पावले उचलायला सुरवात केली आहे.

तुम्हाला जर रोजच्या हवामान अंदाजाच्या अपडेट्सची माहिती मिळवायची असेल तर आजच प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला रोजचा हवामान अंदाज अगदी मोफत पाहता येईल. त्याचबरोबर कृषीविषयक अन्य माहिती देखील मिळेल तीही अगदी मोफत. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच आपले Hello Krushi हे अँप इंस्टाल करा.

error: Content is protected !!