Havaman Andaj : राज्यात ‘या’ भागात पावसाचा इशारा, हवामान विभागाने सांगितली परतीच्या पाऊसाची तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Havaman Andaj : मराठवाड्यात पुढील 4 ते 5 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिला आहे. तसेच विदर्भ आणि कोकणात आज पावसाचा अंदाज आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत राज्यात तुरळक ठिकाणी मेघर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

भंडारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत. गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे 4 दरवाजे उघडले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीपात्रात 16655 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून शिरूर, आंबेगाव, पारनेर तालुक्यातील पाणीप्रश्न यामुळे मिटला आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

25 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास

राज्यात यंदा जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. अनेक भागामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. दि. 25 सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थानच्या भागापासून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरूवात करणार आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

नागपूरात ढगफुटी

नागपूरात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. नागपूरात 4 तासात 100 मि.मी. पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक सर्व सुविधा देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

error: Content is protected !!