Havaman Andaj : राज्यभर पावसाचा जोर अजून वाढणार; वाचा हवामान विभागाचा नवीन अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Havaman Andaj : सध्या राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस (Heavy Rain ) होत आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत. तर अनेक ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. बऱ्याच ठिकाणी पावसामुळे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सरकारने लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी शेतकरी आता मागणी करत आहेत. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढचे पाच दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे. त्याचबरोबर कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईसह रायगड, ठाणे, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामधील सातारा आणि पुणे या जिल्ह्यात देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थिती पाहिली तर या ठिकाणी काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. यामध्येच यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस झाल्यामुळे नद्यांना पूर आला आहे. यामुळे त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर शेतीचे देखील मोठे नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने जवळपास जिल्ह्यातील दोन लाख 37 हजार हेक्टर वरील शेतजमीन बाधित झाली आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सरकारने लवकरच मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.

शेतकऱ्यांचे नुकसान लाखात झाले असून शेतकऱ्यांना मदत ही फक्त हजारात मिळणार आहे. मात्र जी काही मदत मिळेल ती कधी मिळणार? याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Havaman Andaj)

तुमच्या गावात कधी पाऊस पडणार

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावातल्या पावसाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल त्याचबरोबर दररोजचा हवामान अंदाज पाहायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. आम्ही हे खास शेतकऱ्यांसाठी ॲप बनवले आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर हे ॲप इन्स्टॉल करा. यामध्ये तुम्हाला शेतीविषयक बरीच माहिती मिळेल. यामध्ये सरकारी योजना, शेतमालाचे बाजारभाव, पशूंची खरेदी विक्री, रोपवाटिकांची माहिती, अशा अनेक गोष्टींची माहिती तुम्हाला या ॲपमध्ये मिळेल. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप इंस्टॉल करा.

error: Content is protected !!