हवामान अंदाज : राज्यात पावसाचे थैमान!! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, अनेक भागात पूरस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी नदी, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना इशारा दिला आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यात द्रोणागिरी डोंगरावर भूस्खलन होत असल्याने प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरुच असून, जगबुडी आणि काजळी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर शास्त्री – बाव नदी, आणि कोदवली या नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. नदी काठच्या गावांना पूराचा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातल्या ४१ धरणांमधला पाणीसाठा ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

२०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

कोल्हापूर जिल्ह्यातलं राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून, त्यातून ७ हजार ११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून ८५ हजार ८५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात ८१ बंधारे पाण्याखाली गेले असून २०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक गावातल्या लोकांना आणि जनावरांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. खबरदारी बाळगत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या एका तुकडीला जिल्ह्यात पाचारण करण्यात आलं आहे.

घरांमध्ये शिरले पाणी

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद होऊन गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट शहरात रस्त्यावरचं पाणी घरामध्ये शिरलं आहे. नागपूरमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे.

बीड जिल्ह्यात मुसळधार तर नांदेड जिल्ह्यात पूरपरिस्थिती

बीड जिल्ह्यातही अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचले आहे. यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. शहरातले अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नांदेड जिल्ह्यात सततधार पावसामुळे किनवट तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!