Havaman Andaj : ऑगस्ट महिना चालू होताच पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. त्यामुळे ज्या भागात पाऊस पडलेला नाही अशा भागातील शेतकऱ्यांना पावसाची आशा लागली आहे. मान्सूनचा आस उत्तरेकडे सरकल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने उघडीप दिली आहे. तर काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात ढगाळ वातावरणाचा ऊन सावलीच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
तुरळक ठिकाणी पाऊस
राज्यात आज तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आज कोकणातील पालघर जिल्ह्यात तुरळकी ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. (Havaman Andaj)
माहितीनुसार, उत्तरेकडील सरकलेला मान्सूनचा आस किनारपट्टीला समांतर कमी दाब पट्ट्याचा अभाव यामुळे मान्सूनमध्ये खंड पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यांमध्ये पावसाने उघडीप दिली असून अनेक ठिकाणी पावसाच्या फक्त हलक्यासाठी कोसळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अजूनही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा
काही ठिकाणी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असली तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पाहिजे तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेते वातावर निर्माण झाले आहे. पुढील काळामध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागेल असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. यामुळे चांगल्या मुसळधार पावसाची वाट शेतकरी पाहत आहेत.
एका क्लिकवर पहा रोजचा हवामान अंदाज
तुम्हाला जर दररोजचा हवामान अंदाज पाहायचा असेल तर आताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा. या ॲपमध्ये हवामान अंदाज या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही रोजच्या रोज हवामान अंदाज अगदी अचूक पद्धतीने पाहू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे मोजावे लागणार नाहीत. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा.