Havaman Andaj : राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाचा अंदाज; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात आज 3 जुलै रोजी कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार तर विदर्भात वादळी पावसाचा अंदाज (Havaman Andaj) हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात चार ते सहा जुलै पर्यंत अतिवृष्टी, तर विदर्भात विदर्भात वादळी पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात हलक्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे. सध्या कोकण, घाटमाथा, धरणांच्या पाणलोटात पावसाची संततधार पाऊस सुरू आहे. तर राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसाची उघडीप आहे.

यंदा देशात सरासरी २८०.४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. अल निनो सक्रिय असला तरी त्याचा प्रभाव मान्सूनवर दिसत नाही. भारतीय समुद्री स्थिरांक सकारात्मक असल्याने देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे देशातील बळीराजासाठी सुखद गोष्ट आहे.

तुमच्या गावात पाऊस कधी पडणार पहा ? (Havaman Andaj)

मित्रानो, शेतकरी आणि पाऊस यांचं एक वेगळंच नातं आहे. चांगल्या प्रमाणात आणि पुरेसा पाऊस पडला तरच शेतातील पीक चांगल्या प्रकारे येत. त्यामुळे बळीराजा आतुरतेने पावसाची वाट बघत असतो. तुम्हालाही तुमच्या गावात कधी पाऊस पडणार हे पाहायचं असेल तर आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषी अँपच्या माध्यमातून तुम्हाला सलग ४ दिवसांचा अचूक हवामान अंदाज समजतो. याशिवाय हॅलो कृषीवर रोजचा बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या अनेक सुविधा मिळत आहेत. महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

पहा कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस असेल –

जोरदार पावसाचा अंदाज (ऑरेंज अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा अंदाज (यलो अलर्ट): रायगड आणि पुणे

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट ) : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ.

error: Content is protected !!