Heatstroke In Chickens: कोंबड्यांमध्ये वाढतोय उष्माघात? जाणून घ्या लक्षणे, करा हे उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट (Heatstroke In Chickens) सुरू आहे. माणसांप्रमाणे जनावरांना सुद्धा या उष्णतेचा फटका बसत आहे. विशेषतः कोंबड्यांमध्ये उष्माघाताची लक्षणे आढळतात. पुढील काही महिने कोंबडी पालन (Poultry Farming) व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात मांसल कोंबड्यांची चढ्या दराने विक्री होते. परंतु उन्हाचा ताण सहन न करू शकल्याने अंडी, मांस उत्पादनात घट दिसून येते. जाणून घेऊ या कोंबड्यामधील उष्माघाताची (Heatstroke In Chickens) लक्षणे आणि त्यावर करायचे उपाय.

कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी (Chicken Growth) 18 ते 21 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते परंतु ते 28 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान सहन करू शकतात. परंतु 30 अंश सेल्सिअसच्या वरती तापमान गेल्यास त्याचा त्यांच्या उत्पादन (Chicken Production) आणि प्रजो‍त्पादनावर विपरीत परिणाम होतो. बाह्य तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास प्रति अंश सेल्सिअस तापमान वाढीने 5 टक्के उत्पादन घट होते. जास्त तापमानात कोंबड्यांमध्ये खालील प्रमाणे उष्माघाताची लक्षणे (Heatstroke In Chickens) आढळतात.

उष्माघाताची लक्षणे (Signs Of Heat Stroke In Chickens)

  • कोंबड्या तोंडावाटे श्वास घेतात, तोंडाची उघडझाप करून धापा टाकतात
  • त्वचा रखरखीत होते, रंगामध्ये बदल दिसून येतो
  • पाणी जास्त पितात. भूक मंदावते
  • पोट जमिनीला घासतात, डोळे बंद करतात, हालचाल मंदावते, सुस्त राहतात.
  • अंडी उत्पादनात घट होते, अंड्याचे वजन कमी होते
  • अंड्याच्या बाहेरील कवचाची गुणवत्ता कमी होते.
  • शारीरिक वजनात लक्षणीय घट होते, मांसल कोंबड्यांचे वजन कमी होते.
  • प्रजो‍त्पादन यावर उष्णतेचा (Heatstroke In Chickens) विपरीत परिणाम होतो
  • रोगप्रतिकार शक्तीही कमी होते, त्यामुळे आजारास बळी पडतात.
  • खाद्याचे मांसात वा अंड्यात रूपांतर क्षमता कमी होते.
  • कोंबड्या भिंतीच्या आडोशाला पडून राहतात. काही कोंबड्या पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ थंड जागेत मान वाकवून बसतात.
  • शरीराचे तापमान कमी करण्यासाठी व शरीरात थंडपणा आणण्यासाठी पंख शरीरापासून दूर पसरवितात.
  • दीड किलो पेक्षा अधिक वजनाच्या कोंबड्यांना दुपार ते संध्याकाळच्या वेळी ताप येतो. लालसर होऊन मरतात (Heatstroke In Chickens)

उपाय योजना (Precautions For Heat Stroke In Chickens)

  • शेड (Poultry Shade) बांधताना घराची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी. वायुवीजन व्यवस्था सक्षम असावी.
  • उन्हाळ्यात गादीसाठी लाकूड भुश्याऐवजी भाताचे तूस किंवा भुईमुग टरफलांचा वापर करावा
  • गादी म्हणून वापरात येणार्‍या तूसाची जाडी कमी (1 ते 1.5 इंच) करावी.
  • कोंबड्यांची संख्या किमान 10 टक्क्यांनी कमी करावी
  • थंड, स्वच्छ, ताजे पिण्यायोग्य पाणी मुबलक प्रमाणात पुरवावे.
  • पिण्याच्या पाण्याची भांडी संख्या दुप्पट वाढवावी
  • पिण्यासाठी क्लोरीनयुक्त पाण्याचा (Chlorine Water) वापर करावा. यामुळे पाण्यातून होणारे आजार टाळता येतील.
  • पिण्याच्या पाण्यामधून जीवनसत्व (क, ई), सेलेनीअम यांचा वापर करावा. त्यामुळे उष्णतेचा ताण कमी होईल.
  • पिण्याच्या पाण्याची टाकी शेडमध्ये विशिष्ट उंचीवर बसवावी. बाहेरच्या बाजूस बसवली असेल तर त्यास बारदानाची पोती गुंडाळून त्यावर थंड पाणी टाकावे, जेणेकरून आतमधील पाणी थंड राहण्यास मदत होईल.
  • ब्रॉयलर कोंबडीच्या खाद्यात (Poultry Food) मुख्य ऊर्जा स्रोत म्हणून वनस्पती तेलाचा 4 ते 5 टक्के या प्रमाणात वापर करावा.
  • अंडी देणाऱ्या कोंबडीच्या खाद्यात खाण्याचा सोडा वापरावा.
  • अंडी देणाऱ्या कोंबडीच्या खाद्य भांड्यात टाकलेल्या खाद्य पृष्ठभाग यावरती शिंपले अथवा मार्बलचे तुकडे थोड्या प्रमाणात पसरावेत.
  • स्प्रिंकलर्स आणि फॉगर्स (Sprinklers And Foggers In Shade) यांचा वापर हा सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या दरम्यान दर 1 ते 2 तासांनी करावा.
  • खाद्य देण्याचे एक वेळापत्रक ठरवून घ्यावे. त्याचे काटेकोरपणे पालन करावे.
  • खाद्य दिल्यानंतर साधारणतः अर्धा ते दीड तासात कोंबड्यांच्या शरीर तापमानात वाढ होते. यामुळे त्यांच्यावरील उष्णतेचा ताण वाढतो, म्हणून दुपारचे खाद्य देणे टाळावे.
  • बाजूच्या भिंतीच्या जाळीवरती बारदान पोती लावावीत. त्यावर स्प्रिंकलर्सचे पाणी पडेल याची सोय करावी. शेड नेटचा वापर करता येतो.
  • शक्य असल्यास शेडमध्ये कुलर किंवा पंखा याचा वापर करावा
  • छतावर सूर्यप्रकाश (Heatstroke In Chickens) परावर्तित करणाऱ्या पत्र्यांचा वापर करावा जेणेकरून शेडच्या आतील तापमान कमी राखण्यास अधिक मदत होते.
error: Content is protected !!