Heavy Rain : हिंगोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Heavy Rain : अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस बुधवारपासून राज्याच्या विविध भागात कोसळताना दिसत आहे. यामुळे अनेक जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे तर काही गावे देखील पाण्यात बुडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचबरोबर पावसामुळे शेतकऱ्यांचे (farmer) देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शिवारात पाणीच पाणी झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह हळद आणि तुर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. एकीकडे पिकाला मिळत नसलेला भाव आणि दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. (Heavy Rain)

माहितीनुसार, हिंगोली शहरासह कळमनुरी, डोंगरकडा, वरुड, आखाडा बाळापूर, कुरुदा, जवळा बाजार, औंढा नागनाथ इत्यादी भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. शेतीमध्ये पाणीच पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . यामुळे शेतकरी आता मदतीची मागणी सरकारकडे करत आहेत.

तुमच्या गावात कधी पाऊस पडणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजचा हवामान अंदाज पाहायचा असेल तर, आत्ताच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा यामध्ये तुम्हाला रोजचा हवामान अंदाज त्याचबरोबर बाजार भाव, सरकारी योजना, रोपवाटिकांची माहिती, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी त्याचबरोबर अन्य शेती विषयक माहिती मिळेल, त्यामुळे लगेच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा.

error: Content is protected !!