Heavy Rain : अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने राज्याच्या अनेक भागात आता थैमान घातले आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत. अनेक ठिकाणी घरे रस्ते पाण्याखाली गेली आहेत. त्याचबरोबर शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे या. पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकाचे देखील अतोनात नुकसान झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी राजा आता चिंतेत आहे मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला आणि जवळपास 40 हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाला आहे.
मागच्या दोन दिवसापासून यवतमाळ मध्ये मुसळधार पाऊस होत आहे या ठिकाणी एवढा पाऊस झाला आहे की, या ठिकाणी भरून न निघणारी हानी झाली आहे त्यामुळे शेतीचे तर नुकसान झाले आहेत मात्र नागरिकांनी रात्र जागून आपला जी वाचवला आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील अतिशय भयानक पाऊस असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये कोणाचे घर पडले आहे तर कोणाचे शेत देखील वाहून गेले आहे. त्यामुळे येथील लोकांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. (Heavy Rain )
या ठिकाणी एवढा भयानक पाऊस झाला आहे की लोकांच्या घरातील सर्व वस्तू वाहून गेल्या आहेत त्यामुळे या झालेल्या नुकसानीचा आर्त टोहो शेतकरी आणि अपघातग्रस्त नागरिक करत आहेत. सरकारने या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण आणि पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र आता नुकसान भरपाई मिळाली तर ती देखील तोडकीच मिळणार. त्यामुळे एवढे मोठे झालेले नुकसान कसे भरून निघणार हा तेथील पूरग्रस्त नागरिकांना सर्वात मोठा प्रश्न पडला आहे.
तुमच्या गावात कधी पाऊस पडणार?
शेतकरी मित्रांनो आता जवळपास सगळीकडे पाऊस होत आहे. मात्र तुमच्या गावात कधी पाऊस पडणार याबाबतची तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक ॲप बनवले आहे. Hello Krushi असं ॲपचं नाव आहे. त्यामुळे तुम्हाला जर पावसाविषयी काही माहिती घ्यायची असेल तर लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन आपले हॅलो कृषी हे ॲप इंस्टॉल करा यामध्ये तुम्ही रोजचा हवामान अंदाज चेक करू शकता त्याचबरोबर कृषीविषयक अन्य माहिती देखील तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता तेही अगदी मोफत.