शेतकर्‍यांना कोणी जास्त दरात खत विकत असेल तर ‘या’ नंबरवर करा फोन; जिल्हाधिकारी शिकवतील दुकानदारास अद्दल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । केंद्र शासनाने दि.22 मे 2021 रोजी सुधारित मूल्य द्रव्य आधारित अनुदान जाहीर केले आहे. यामध्ये स्फुरद या अन्नद्रव्याचे अनुदान वाढविण्यात आल्यामुळे स्फुरदयुक्त खतांच्या किंमतीमध्ये मोठया प्रमाणात घट झाली आहे. शेतकऱ्यांनी खतांच्या सुधारित अनुदानामुळे कमी झालेल्या किंमतीमध्ये खतांची खरेदी करावी. तरीही काही ठिकाणी जुन्या दराने खतांची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. यावर आळा घालण्यासाठी शासनाने काही हेल्पलाईन आणि तक्रार दाखल करण्यासाठी क्रमांक जाहीर केले आहेत. व अश्या खते विक्रेत्यांची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

सुधारित अनुदान जाहिर होण्याच्या पूर्वीच्या किंमतीत खत विक्री होत असल्यास, आयुक्तालय स्तरावरील नियंत्रण कक्षामधील भ्रमणध्वनी क्र. ८४४६११७५००टोल फ्री क्र. १८०० २३३ ४००० या क्रमांकावर दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत संपर्क साधावा. तसेच आपल्या जिल्हयाचा नियंत्रण कक्ष, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी (पंचायत समिती) यांचेकडे तक्रार करावी, असे आवाहन आयुक्त (कृषि), श्री धीरजकुमार यांनी केले आहे. असे प्रकरणे आढळून आल्यास त्यावर तात्काळ कारवाही करण्यात येणार असल्याचेही कृषी आयुक्तांनी सांगितले.

शासनाने स्फुरद खतांवर अनुदान वाढवल्याने याच्या किमती कमी झाल्या. पण, खते विक्रेत्यांनी त्या कमी किमतीने खते शेतकऱ्यास देण्यास टाळाटाळ करू लागले आहेत. खतांचा जुना स्टॉक आहे त्यामुळे जुने दर लागू होतील असे कारणे सांगितले जात आहेत. यावर अनेक तक्रारी कृषी आयुक्तालयात दाखल झाल्यानंतर शासनाने हे पाऊल उचलले आहे.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

Leave a Comment

error: Content is protected !!