Land Survey : मोबाईलवरून सरकारी मोजणी कशी बोलवायची? 10 एकर जमीन काही मिनिटांत मोजता येणार, सरकारने घेतला मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Land Survey : आपल्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचे जमिनीवरून वाद होत असतात. तुझ्याकडे जास्त जमीन आली आहे आणि मला कमी जमिनी आहे या कारणावरून शेतकऱ्यांमध्ये कायम तणाव निर्माण झालेला प्रत्येक गावात पाहायला मिळतो (Land Records). जमिनीवरून वारंवार वाद होऊनही शेतकरी जमीन मोजणी (Land Measurement) करायला टाळाटाळ करतात. जमिनीची मोजणी बोलावल्यानंतर बरेच दिवस त्यात जातात अन खर्चही येतो. जमीन मोजणीची प्रक्रिया खूप किचकट अन वेळ खाऊ असल्याने शेतकरी मोजणी न करता बांधावरून भांडण करत राहतात. मात्र आता तुम्ही 10 एकर जमिनसुद्धा अगदी काही मिनिटांत तुमच्या मोबाईलवरून अगदी सहज मोजू शकता. यासाठी Hello Krushi नावाचे एक विशेष मोबाईल अँप बनवण्यात आले आहे.

10 एकरची मोजणी काही मिनिटांत

शेतकरी मित्रांनो आता तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. जमीन मोजणीसाठी पूर्वी खूप वेळ जायचा. मात्र आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अचूक जमिनीची मोजणी करू शकणार आहात. १० एकर जमिनीची मोजणीही काही मिनिटांत करणे यामुळे शक्य झाले आहे. यासाठी Hello Krushi नावाचे विशेष अँप तयार करण्यात आले आहे. आत्तापर्यंत १ लाखहून अधिक शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. तुम्हालासुद्धा जमीन मोजणीसोबत सातबारा उतारा, भूनकाशा, शासकीय योजनांना अर्ज करणे, रोजचे बाजारभाव जाणून घेणे, हवामान अंदाज मिळवणे या सेवांचा मोफतमध्ये लाभ घ्यायचा असेल तर आजच मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करून अँप इन्स्टॉल करा.

यापूर्वी जमीन मोजणीची प्रक्रिया किचकट

जर आपण जमीन मोजणी करण्याचा निर्णय घेतला तरी याकरिता आपल्याला भूमी अभिलेख विभागाकडे खूप हेलपाटे मारावी लागतात. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही जातो. मात्र वेळ आणि पैसा जाऊन देखील शेतकऱ्यांच्या हाती लवकर काहीच लागत नाही. शेतकऱ्यांना यासाठी बरीच वाट पाहावी लागते. आपण जमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर आपल्याला काही ठराविक कालावधी दिला जातो त्या कालावधी कालावधीनंतर आपली जमिनीची मोजणी केली जाते.

यावेळी ठरलेल्या तारखेला भूमापक संबंधी जमिनीच्या जागेवर येऊन प्रत्यक्ष आपल्या जमिनीची मोजणी करतात. मात्र या सर्व प्रक्रिया करतांना खूप वेळ लागतो आणि ही प्रक्रिया किचकट असल्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित होतात. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांची शेत जमिनीची मोजणी कमी वेळेमध्ये आणि अचूक व्हावी याकरिता राज्य शासना भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून रोव्हर पद्धत वापरणार आहे.

तातडीची शासकीय मोजणी मोबाईलवरून कशी बोलवायची?

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून शासकीय मोजणी बोलावू शकता. प्रथम Hello Krushi अँपवरून जमीन मोजणी करून तुमची जमीन किती भरतेय, त्यात काही बदल आहे का याचा अंदाज घ्या. जर तुमची जमीन कमी किंवा जास्त भरते असे वाटत असेल तर कायदेशीर बदलासाठी तुम्हाला सरकारी मोजणी बोलवावी लागेल. मात्र शासकीय मोजणीसाठीही तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही Hello Krushi अँपवरील सरकारी योजना मधील जमीन मोजणी ऑनलाईन अर्ज यावर क्लिक करून घर बसल्या शासकीय मोजणी बोलावू शकता. आता रोव्हर पद्धतीने जमीन मोजणी करण्यात येत असल्याने पूर्वीप्रमाणे मोजणीला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे मोजणीला अर्ज केल्यानंतर काही दिवसांतच तुमची मोजणी होऊन जाईल.

रोव्हर पद्धत नेमकी काय जाणून घेऊयात (Rover method)

शेतकऱ्यांना जमीन मोजणीसाठी कमी वेळ लागावा आणि शेतकऱ्यांची जमीन मोजणी अचूक मोजणी व्हावी यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून 87 स्टेशन उभारण्यात आले आहेत. या स्टेशनचा संपर्क हा सॅटेलाईटशी येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन मोजणी अगदी अचूक पद्धतीने होणार आहे. याच दृष्टिकोनातून रोव्हर यंत्र असून त्याचा वापर आता शेतात घेऊन जमीन मोजण्यासाठी होऊ शकणार आहे . त्यामुळे शेतकऱ्यांचे दिवसाचे काम आता एका तासात होणार आहे. हे यंत्र सॅटेलाइटशी जोडलेले आहे. त्यामुळे उभारलेल्या या स्थानकांच्या मदतीने जमीन मोजणी काही वेळातच करता येणार आहे. तुम्हाला ज्या जमिनीची मोजणी करायची आहे ती स्थानकांमधून संकलित करण्यात येणार असून या प्रक्रियेमुळे आता जमीन मोजणीच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा देखील करणे शक्य होणार आहे.

तासाभरातच होणार जमिनीची मोजणी

शेतकऱ्यांना जर अगोदर जमीन मोजणी करायची म्हटली तर दहा एकर जमीन मोजणी करायची असेल तर त्यासाठी साधारणपणे एक दिवस इतका वेळ लागत होत. त्यानंतरच्या कालावधीमध्ये इटीएस यंत्राचा वापर केला जायचा त्याला देखील दहा एकर क्षेत्राची मोजणी करायची म्हटल्यासाठी तीन ते चार तास लागायचे यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा मात्र आता या यंत्राच्या साह्याने शेतकऱ्यांची मोजणी केवळ तासाभरातच होणार आह. त्यामुळे शेतकऱ्यांची वेळेची देखील मोठी बचत होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जमीन मोजणी संबंधित अनेक प्रकरणे रखडलेली असतात. मात्र आता जमीन मोजणीच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा लवकरात लवकर व्हावा यासाठी यंत्र खरेदी करिता निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात करण्यात येणार असून यापूर्वी 900 यंत्र खरेदी करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर आता नवीन सहाशे यंत्र देखील उपलब्ध होणार आहेत.

ॲपच्या माध्यमातूनही जलद होईल जमीन मोजणी

तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळावा याचाच विचार करून शेतकऱ्यांसाठी Hello Krushi नावाच्या मोबाईल अँपची निर्मिती करण्यात आली आहे. गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असणारे हे ॲप दोन मिनिटांमध्ये तुमच्या जमिनीची मोजणी करून देते त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप इंस्टॉल करा. हे ॲप फक्त तुम्हाला जमिनीची मोजणीच नाही तर त्याचबरोबर सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, भु नकाशा आदी बाबत तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळेल त्यामुळे लगेचच हे ॲप इंस्टॉल करा.

रोव्हर मशीनचे नेमके फायदे काय?

रोव्हर मशीनने मोजणी केल्यानंतर त्याचे अक्षांश आणि रेखांश मिळणार आहेत. परिणामी जर कधी भूकंप आला किंवा महापूर येऊन तुमची जमीन जर वाहून गेली तर या अक्षांश रेखांशचे जतन केल्यामुळे तुम्हाला तुमची पूर्वीची जमीन सहजपणे मिळणार आहे. याचे अक्षांश रेखांश नोंदविलेले असल्यामुळे बांध कोरणारे देखील आता उघडे पडतील. लोकांना बांध कोरता येणार नाहीत हा शेतकऱ्यांना एक मोठा फायदा होणार आहेत.

error: Content is protected !!