पाळीव प्राणी, जनावरांना कोरोनाचा धोका किती? जाणुन घ्या पशुधन अधिकार्‍यांचे मत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : 2020 पासून चीन या देशातून फैलाव झालेल्या कोरोना व्हायरस या विषाणूने संपूर्ण जगाला नकीनऊ आणले आहे.कोविड च्या दुसऱ्या लाटेने भारत देशात देखील वेगाने हात पसरवत नागरिकांना जेरीस आणले आहे. पण या कोरोना व्हायसर चा धोका जाणवरांना कितीपत आहे? याच्याबद्दल थोडे जाणून घेऊया…

कोरोना व्हायरस ज्याने जगाला नकीनाऊ आणले आहे त्याचा जनावरांवर काय परिणाम होतो याची माहिती करून घेण्यासाठी आम्ही पशुधन विकास अधिकारी तळसंदे डॉ.संजय देविदास पाठक यांच्याशी चर्चा केली. डॉ. पाठक म्हणाले की, जानावरांमध्ये कोरोना होत नाही. किंबहुना तशा केसेस पुढे तितक्या प्रमाणात आल्या नाहीत. जनावरांमध्ये असा कोणता घटक आहे जो कोरोनाच्या संक्रमनापासून त्यांचा बचाव करतो? तर जनावरांच्या फुफुसमध्ये असणारे रिसेप्टर याला कारणीभूत आहेत.

माणसाच्या फुफुस्संमध्ये जे रिसेप्टर आहेत ते जनावरांमध्ये नाही. अशी माहिती पाठक यांनी दिली. शिवाय एका संशोधनात असे देखील आढळून आले आहे की कुत्र्यांना विशेष प्रशिक्षण दिल्यानंतर कुत्रा कोरोनाबाधित रुग्ण कोणता आहे हे ओळखू शकतो. मात्र बाधित व्यक्तीच्या संपर्कात येऊन देखील कुत्र्यांना कोरोनाचे संक्रमण होत नाही. अशी माहिती डॉ. पाठक यांनी दिली. तसेच आणखी पुढे जाऊन त्यांनी असे उदाहरण दिले की, कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार गावात जेव्हा कोरोनाचा फैलाव वाढला होता तेव्हा तेथील एका व्यक्तीने कुटुंबापासून स्वतःला विलगीकरण करण्यासाठी गोठ्याचा पर्याय निवडला होता. गोठ्यातच त्याच्यावर उपचार सुरु होते मात्र तरीदेखील गोठ्यातील जनावराला कोरोनाचा संसर्ग झाला नाही.

कोरोनाचा माणसांवरच हल्ला का?

एका संशोधनात असे आढळून आले आहे की कोरोना व्हायरस ची बाह्य आवरणवरील टोकादार संरचना असते. ही संरचना मानवी शरीरातील कोशिकांमध्ये सापडणाऱ्या प्रोटीनशी चांगल्या पद्धतीने जोडली जाते. कोरोना व्हायरस ची हीच टोकादार संरचना माणसासाठी खूप घातक आहे. म्हणून देखील संशोधक कोरोनाचा माणसाच्या शरीरात जोडल्या जाणाऱ्या बॉण्ड तोडण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

2020 मध्ये कोरोना साथीच्या फैलावादरम्यान असे आढळून आले होते की, ‘लामा’ नावाच्या पाळीव प्राण्यामध्ये कोरोनाची लागण झाली. मात्र त्या प्राण्याने कोरोनावर मात केली. त्याच्या शरीरामध्ये कोरोनाशी लढण्याच्या अँटीबोडीज तयार झाल्याचे आढळले. पाळीव प्राण्यांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याची काही प्रकरण समोर आली आहेत. मात्र त्यामुळे एखाद्या पाळीव प्राण्याचा जीव गेल्याची मात्र नोंद नाही. कोरोनाच्या भीतीने काही लोकांनी आपले पाळीव प्राणी रस्त्यावर सोडून दिल्याची देखील उदाहरणे आहेत.

मात्र कोरोनामुळे कोणत्याही जनावराचा मृत्यू झाल्याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.मोठ्या जनावरांमध्ये कोरोना अद्याप आढळला नाही. मात्र पुढे कोरोनाचा धोका आहे का? असे झाल्यास काय होइल? याबाबत संशोधन सध्या सुरू आहे. दरम्यान, एका प्राण्यामधून आलेल्या व्हायरस ने माणसाच्या नाकी दम करून ठेवला आहे मात्र जनावरांमध्ये त्याचा धोका नाही असंच चित्र साध्या दिसते आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!