Get Good Quality Guava: गुणवत्तापूर्ण पेरुचे उत्पादन मिळवण्यासाठी, पंजाबमधील शेतकरी करतात हे उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पेरू (Get Good Quality Guava) हे पंजाबमधील मोसंबीनंतरचे दुसरे महत्त्वाचे फळपिक आहे. हे फळपिक क्षारयुक्त आणि अल्कधर्मी जमिनीतही चांगले येते. पंजाब (Punjab) राज्यातील एकूण फळ उत्पादनात 12.8% वाटा पेरुचा आहे. शिवाय इतर फळपिकांच्या तुलनेत या फळपिकाच्या लागवडीचा खर्च (Production Cost) सुद्धा कमी आहे.

पंजाबमध्ये पेरुची प्रामुख्याने दोन पिके घेतात: पावसाळी (Kharif) पीक (जुलै-ऑगस्ट) आणि हिवाळी (Rabi) हंगामातील पीक (नोव्हेंबर-जानेवारी). पावसाळी पिकांची फळे सामान्यत: चवीला रूक्ष असतात आणि त्यांची शेल्फ लाइफ खराब असते. तसेच या पि‍कावर फळमाशी व करपा रोगाचा (Anthracnose) प्रादुर्भाव जास्त आढळतो. हिवाळी हंगामातील पिकांची फळे आकार, दर्जा, चव आणि सुगंधाने श्रेष्ठ असतात आणि कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो, त्यामुळे बाजारात त्यांना जास्त भाव (Guava Rate) मिळतो.

मार्च-एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या heat फ्लशमुळे, पावसाळी हंगामातील पेरुला (Get Good Quality Guava) भरपूर फुले येतात, तर हिवाळी हंगामातील पेरुला कमी प्रमाणात फुले येतात. अतिवृष्टीमुळे पावसाळी पेरुचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे उत्पादकांना कमी भाव मिळतो. त्यामुळे पावसाळी हंगाम वगळून त्यावेळी योग्य नियोजन केल्यास हिवाळी हंगामातील पेरुचे गुणवत्तापूर्ण फळे मिळू शकतात (Get Good Quality Guava). जाणून घेऊ या बद्दल .

छाटणी (Pruning): पावसाळी पिकांना फुले येऊ नयेत म्हणून 20 ते 30 एप्रिल दरम्यान 20 किंवा 30 सें.मी. शेंड्याची छाटणी करावी.

सिंचन रोखणे (Withholding Irrigation): एप्रिल-मे दरम्यान झाडाला पाणी न दिल्यास पावसाळी पिकातील फुलांची गळती होतात. हिवाळी हंगामातील पिकांसाठी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जास्तीत जास्त फुले येणे गरजेचे असते, यासाठी जून महिन्यात झाडाला योग्य प्रकारे सिंचित करावे आणि शिफारशीत रासायनिक खते आणि शेणखत द्यावे. यामुळे जुलै – ऑगस्ट मध्ये झाडाची चांगली वाढ होते (Get Good Quality Guava).

मोहर गळ करणे (De-Blossoming): पावसाळी हंगामात फळे लागू नये पेरुच्या झाडावरील मोहर काढला जातो. लहान शेत असेल तर फुले हाताने देखील काढली जाऊ शकतात परंतु मोठ्या शेतात व्यावसायिक लागवडीमध्ये ते कष्टदायक आणि वेळखाऊ असते. मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी, 10% युरिया (10 किलो युरिया 100 लिटर पाण्यात) किंवा 600 पीपीएम एनए (नॅफ्थालीन ऍसिटिक ऍसिड) (60 ग्रॅम एनएए 150-200 मिली अल्कोहोलमध्ये विरघळवून 100 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करून झाडावर फवारणी करावी.  मे महिन्यात जेव्हा जास्त प्रमाणात मोहर आलेला असतो (Get Good Quality Guava) तेव्हा ही फवारणी करावी.

फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी इतर इको-फ्रेंडली पद्धती (Get Good Quality Guava)

फळांना आच्छादित करणे (Fruit Bagging): पंजाब कृषी विद्यापीठाने पावसाळी फळे झाकण्यासाठी पांढऱ्या न विणलेल्या पिशव्या वापरण्याची शिफारस केली आहे. परिपक्व हिरव्या कडक फळांना जूनच्या अखेरीपासून जुलैच्या मध्यापर्यंत (रंग तुटण्याच्या अवस्थेत) झाकण्यासाठी पिशवीचा वापर केल्याने फळमाशीच्या प्रादुर्भावापासून तसेच पक्षांपासून फळांचे संरक्षण होते, त्यामुळे फळाच्या सालीचा रंग सुधारतो. बॅगबंद फळांना बाजारात चांगला भाव मिळतो.

फळमाशी सापळ्यांचा वापर (Fruit Fly Traps): इको-फ्रेंडली फ्रूट फ्लाय सापळे बसवून फळमाशीच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन केले जाऊ शकते. या सापळ्यांमध्ये फळातील माशीच्या नरांना आकर्षित करण्यासाठी फेरोमोन्स असतात जे त्यांच्या नैसर्गिक जीवनचक्रात व्यत्यय आणतात. फळ माशांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात फळमाशी सापळे @16 सापळे/एकर याप्रमाणात लावावेत.

इतर उपाय (Cultural Practices): फळमाशी प्रादुर्भावीत फळे नियमितपणे काढून जमिनीत खोल खड्यात पुरावी.  उन्हाळ्यात चांगली नांगरणी केल्याने 4-6 सेमी खोलीवर जमिनीत असलेल्या फळमाशीच्या अळ्या बाहेर पडतात व त्यांचे नियंत्रण होते. वरील सर्व उपायांचा अवलंब केल्यास उत्तम दर्जाची (Get Good Quality Guava) पेरू फळे मिळतात, आणि यातून चांगले  चांगले आर्थिक उत्पन्न सुद्धा मिळू शकते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा या उपायांचा अवलंब करण्यास हरकत नाही.

error: Content is protected !!