Care Of Goats in Summer: उन्हाळ्यात शेळ्यांची घ्या विशेष काळजी; लक्षात ठेवा या गोष्टी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेळ्या (Care Of Goats in Summer) या प्रामुख्याने चराई पद्धतीवर पाळल्या जातात. उन्हाळ्यात बहुतेक वेळी चराई क्षेत्रावर चरण्यासाठी खूप कमी व निकृष्ट प्रतिचा चारा (Fodder) शिल्लक असतो. अशावेळी शेळ्यांची बरीच शक्ती चालण्यात जाते आणि त्यांना पोटभर अन्नही मिळत नाही तसेच उन्हात त्यांना भीषण उष्ण तापमानाचा सामना करावा लागतो आणि त्यांना उष्णता दाह होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात उष्णतेमुळे शेळ्यांची वाढ, उत्पादन व प्रजो‍त्पादनात यावर दुष्परिणाम होतो. काही वेळा शरीरातील पाणी कमी होऊन त्या दगावण्याची शक्यताही वाढते त्यामुळे उन्हाळ्यात शेळ्यांची विशेष काळजी (Care Of Goats in Summer) कशी घ्यावी ते जाणून घेऊ या.

अशी घ्या शेळ्यांची काळजी (Care Of Goats in Summer)

  • शेळ्यांना दररोज हिरवा चारा (Green Fodder) पाच किलो आणि एक किलो वाळलेला चारा द्यावा.
  • मांस उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे जे काही घटक आहेत ते चाऱ्यामधून मिळत नसल्यामुळे चाऱ्यात क्षार मिश्रण व प्रतिजैविके (Antibiotics) मिसळून द्यावीत.
  • तसेच विकरांचा वापर जर चाऱ्यासोबत केला तर त्याची पचनियता वाढते व शरीराला पौष्टिक घटक मिळून मांस उत्पादन (Goat Meat Production) वाढण्यास मदत होते.
  • शेळ्यांच्या आहारामध्ये क्षार मिश्रण आणि प्रतिजैविकाचा वापर खूप महत्त्वाचा आहे. क्षार मिश्रणाचा वापर केल्यास कमतरतेचे आजार कमी होतात व मांस उत्पादन वाढते. तसेच प्रतिजैविकाचा वापर केल्यास रोगप्रतिकारक क्षमता (Immunity) वाढते व शेळ्या आजारी पडत नाहीत.
  • उन्हाळ्याचा साधारणपणे (Care Of Goats in Summer) सकाळी 11 ते संध्याकाळी 4 या कालावधीमध्ये उन्हाचा तडाका जास्त असतो. यावेळी शेळ्यांना बाहेर चरायला (Grazing) सोडू नये. अन्यथा त्यांना उष्माघाताचा (Heat Stroke) त्रास जाणवू शकतो. शेळ्यांना सकाळी सहा ते नऊ या वेळेस किंवा संध्याकाळी पाच ते सात या वेळेस चरण्यासाठी सोडावे.
  • शक्यतो उन्हाळ्यामध्ये गोठ्यातच चाऱ्याची व्यवस्था करून शेळ्याना खायला द्यावे. उन्हाळ्यामध्ये जर शेळ्यांना (Care Of Goats in Summer) चरण्यासाठी सोडले तर उन्हात भटकल्यामुळे पोषणतत्वे व्यवस्थित मिळत नाहीत व त्यांची प्रकृती खालावू शकते.
  • पाणी व्यवस्थापन करताना शेळ्यांना 24 तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल अशी सोय करावी. शेळ्यांना पाणी देताना (Water for Goats) ते पुरेसे स्वच्छ व थंडगार असेल याची काळजी घ्यावी.
  • शेळ्यांच्या शेडमध्ये (Goat Shed) पुरेशी जागा राहील अशा पद्धतीने शेडची रचना असेल तर गोठ्यातील तापमानात वाढ होत नाही व तापमानाचा विपरीत परिणाम शेळ्याना होत नाही.
  • उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्यांपासून अमोनिया वायू मोठ्या प्रमाणावर तयार होत असतो. त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती राहील याकडे लक्ष द्यावे.
  • उन्हाळ्याच्या कालावधीत शेळ्यांच्या अंगावरचे केस जास्त वाढू देऊ नयेत. उन्हाळ्यामध्ये शेळ्यांचे वाढलेले केस कापून घ्यावेत.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेळ्यांना लाळ्या खुरकूत आणि घटसर्प तसेच आंत्रविषार यासारख्या रोगांचे लसीकरण (Goat Vaccination) या कालावधीत करून घेणे गरजेचे आहे. यामध्ये लसीकरण करण्याच्या दोन दिवस अगोदर व लसीकरणानंतर इलेक्ट्रोलाईट पावडर, बी कॉम्प्लेक्स द्यावे म्हणजे शेंळ्यावर लसीकरणाचा जो काही ताण येतो तो येत नाही (Care Of Goats in Summer).
error: Content is protected !!