Hydroponic Farming : हायड्रोपोनिक शेतीसाठी अनुदान मिळते का? वाचा… कशी केली जाते ‘ही’ शेती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये जमिनींचे प्रमाण (Hydroponic Farming) कमी होत चालले आहे. जमिनी कमी होत असताना अन्नधान्य आणि भाजीपाल्याची गरज मात्र वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतीमध्ये हायड्रोपोनिक तंत्रज्ञान समोर आले आहे. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करणे म्हणजे मातीशिवाय केवळ पाण्याचा वापर करून शेती करणे होय. ही करण्याची आधुनिक पद्धती आहे. ज्यामध्ये हवामान नियंत्रित ठेऊन पिकांचे उत्पादन घेतले जाते. या प्रकारामध्ये तापमान 15-30 अंश आणि आर्द्रता 80-85 टक्के इतकी नियंत्रित ठेवली जाते. याच पार्श्वभूमीवर आज आपण हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या (Hydroponic Farming) मदतीने महाराष्ट्रात शेती करण्यासाठी अनुदान कसे मिळवता येते? किंवा ते प्रमाणात मिळते? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

काय आहे हायड्रोपोनिक तंत्रज्ञान? (Hydroponic Farming Subsidy For Farmers)

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करताना पाईप वापरले जातात. किंवा काही ठिकाणी स्टील देखील वापरून त्यास छिद्र पाडले जातात. त्या छिद्रांमध्ये भाजीपाला किंवा फळ झाडे लावली जातात. पाईपमध्ये पाणी असते आणि झाडांची मुळे त्या पाण्यात बुडून राहतात. झाडाला लागणारे प्रत्येक पोषक तत्व या पाण्यात विरघळते. त्यामुळे आता या तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी सरकारकडून देखील प्रयत्न केले जात आहे. शेतकऱ्यांचे जमिनीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्यासाठी ५० टक्के अनुदान उपलब्ध करून देत ​​आहे.

पशुखाद्यासाठी 50 टक्के अनुदान

केंद्र आणि राज्य सरकारांकडून हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या (Hydroponic Farming) मदतीने शेती करण्यासाठी एकूण गुंतवणूक खर्चावर अनुदान दिले जाते. अनुदान रकमेत राज्यांनुसार बदल पाहायला मिळतो. डेअरी व्यवसायात पशुखाद्यासाठी हायड्रोपोनिक्सचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जात आहे. याशिवाय देशपातळीवर राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून विविध राज्यासाठी वेगवेगळ्या रकमेत अनुदान दिले जात आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यास तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण चारा उत्पादनासाठी मदत झाली आहे.

विना मातीचे कसे घेतात पीक?

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्यासाठी मजबूत लोखंडी एंगलच्या मदतीने व्ही आकाराची रचना तयार केली जाते. हे एंगल्स जमिनीत दीड फूट गाडले जातात. आणि ते जमिनीपासून सहा फूट उंच असतात. या ‘व्ही’ आकाराच्या संरचनेत, 6 मीटर लांब आणि 10 सेमी व्यासाचे तीन पीव्हीसी पाईप दोन्ही बाजूंना समोरासमोर बसवले जातात. या पाईप्सवर तीस सें.मी. अंतराने साडेसात सें.मी. व्यासाचे छिद्र पाडली जातात. या पाईप्सच्या बंद टोकाकडे जमिनीत किमान 100 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी ठेवली जाते. ज्याद्वारे पाईपमध्ये लावलेल्या भाजीपाला पिकाला किंवा फळ पिकांना पाणी पुरवठा केला जातो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्यासाठी विजेची नियमित आवश्यकता असते.

error: Content is protected !!