Hydroponics Fodder Production: हायड्रोपोनिक्स शेतीद्वारे चारा निर्मिती करणाऱ्या शेतकर्‍यांना मिळणार 50 टक्के अनुदान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र सरकारने जनावरांच्या चाऱ्यासाठी हायड्रोपोनिक्स शेती (Hydroponics Fodder Production) करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान (Agriculture Subsidy) देण्याची घोषणा केली आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाला (Modern Agricultural Technology) चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे मातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हे पाऊल (Hydroponics Fodder Production) उचलण्यात आले आहे.

काय आहे हायड्रोपोनिक्स शेती? (Hydroponics Farming)

या तंत्रज्ञानात मातीऐवजी, पाण्यात रोपे लावून शेती केली जाते. पाईपला वरून छिद्रे पाडून त्यात रोपे लावली जातात आणि पाईपमधील पाण्यातून रोपांना आवश्यक पोषकद्रव्ये दिली जातात.

या आधुनिक शेतीमुळे कमी जागेत जास्त उत्पादन मिळते, पाण्याचा कमी वापर होतो, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि विशेष म्हणजे वर्षभर शेती करता येते.

अनुदान कसे मिळवायचे?

हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन त्यांच्या राज्यात उपलब्ध असलेले अनुदान आणि योजना शोधावे लागतील. अनुदानासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना हायड्रोपोनिक्स शेती (Hydroponics Fodder Production) स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
  • हे अनुदान केवळ जनावरांच्या चाऱ्यासाठी हायड्रोपोनिक्स शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे.
  • अनुदानाची रक्कम आणि अटी राज्यानुसार बदलू शकतात.

अधिक माहितीसाठी, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.

error: Content is protected !!