हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी कराड
स्वभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठ विधान केलं आहे. येणाऱ्या काळात मला कोणत्याही आघाडीत जायचे नाही. मी आता फक्त शेतकरी एके शेतकरी असाच राहणार आहे. त्यामुळे आता मला बाकी काही नको… असं म्हणत मी काही राजकीय संन्यास घेणार नाही. असंही शेट्टी यांनी सांगितले. ते कराडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजकारणाचा दर्जा खालावला
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, सध्याचा राजकारणातला स्तर हा अतिशय खालावलेला आहे. लोकशाहीला न पटणारा प्रकार सध्या राजकारणात सुरू आहे. सध्या राजकीय नेत्यांमधून भाषा वापरली जाते किंवा एकमेकांबद्दल द्वेष व्यक्त केला जातो हे बरोबर नाही. उदाहरण देताना त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचं उदाहरण दिलं महिलांची सन्मान करण्याचे आपली संस्कृती आहे. त्यांनी ज्या प्रकरची भाषा वापरली ते चुकीचं आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभाणारे आहे. भले ते विरोधी पक्षातील का असेना असं सांगत ते लहान असताना यशवंतराव चव्हाण आणि शालिनीताई पाटील यांच्या वेळची एक आठवण सांगितली.
शालिनीताईनी यशवंतराव चव्हाण यांच्या टिका केली होती. पण यशवंतराव चव्हाणांनी त्यांना उलट उत्तर दिले नव्हते. याला सुसंस्कृतपणा म्हणतात असं उदाहरण देताना शेट्टी यांनी सांगितले.
राहुल गांधींची भूमिका मला पटली
राहुल गांधी यांच्या पदयात्रेबाबत प्रश्न विचारला असता राजू शेट्टी म्हणाले राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे स्वागतच आहे. मी अनेकदा अशा प्रकारच्या पदयात्रा काढलया आहेत. त्यामुळे तळागाळातल्या जनतेचा थेट संपर्क होतो. काय खरं जीवन आहे ते कळते. ते पुढे म्हणाले पंतप्रधानांनी सुद्धा वेळ काढून त्यांनी अशा प्रकारच्या पदयात्रा काढाव्यात असं मला वाटतं. त्यांनी जग फिरून बघितलं आता देशही बघता येईल असा टोला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजू शेट्टी यांनी लगावला. राहुल गांधींची ही भूमिका मला पटली आहे असे देखील राजू शेट्टी यांनी म्हटलं. ऊस आंदोलनातून मोकळीक मिळाली की भारत जोडो यात्रेत जाऊन राहुल गांधींची भेट घेईन असे ते म्हणाले. महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात जाऊन देखील त्यांच्या पदयात्रेला मी भेट देऊ शकतो असं ते म्हणाले.