ICRISAT Research in Peanut: इक्रिसॅट संस्थेमार्फत भुईमुगातील नवे संशोधन ठरेल बुरशीजन्य संसर्गाविरूद्ध लढण्यास उपयुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टीटयूट फॉर द सेमी-एरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) ही आंतरराष्ट्रीय संस्था (ICRISAT Research in Peanut) ग्रामीण विकासासाठी कृषी संशोधन करते. ही संस्था वेगवेगळ्या पिकांवर संशोधन करते. भुईमुग लागवडीची इक्रिसॅट पद्धती (ICRISAT Research in Peanut) शेतकऱ्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.

इक्रिसॅट  संस्थेमधील (ICRISAT) शास्त्रज्ञांनी काही भुईमुगात एक अज्ञात स्व-संरक्षण यंत्रणा शोधून काढली आहे (ICRISAT Research in Peanut) जी बुरशीजन्य संसर्गाशी लढण्यास मदत करते. या संशोधनामुळे केवळ शेंगदाण्याच्या काही जातींमध्येच नव्हे तर इतर पिकांमध्येही नैसर्गिक संरक्षण यंत्रणा विकसित होऊ शकते.

शेंगदाण्यामुळे होणारा ऍस्परगिलस संसर्ग आणि त्यानंतरच्या अफलाटॉक्सिन यामुळे अन्न सुरक्षा आणि मानवी आरोग्यास लक्षणीय धोका निर्माण होतो. अफलाटॉक्सिनचा प्रतिबंध करणे ही एक  अत्यंत क्लिष्ट पद्धती आहे.  

अफलाटॉक्सिन (Aflatoxin) एक शक्तिशाली कर्करोग निर्माण करणारा (कार्सिनोजेन) विषारी घटक आहे जे ऍस्परगिलस (Aspergillus) प्रजातींच्या संसर्गामुळे तृणधान्ये, तेलबिया, कडधान्ये आणि काजू यांसारख्या विविध अन्न पिकांमध्ये जमा होते. अफलाटॉक्सिन हे सध्या एक महत्त्वपूर्ण जागतिक आव्हान आहे, जे अन्न सुरक्षा, मानवी आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करते.

तसेच खाद्य वस्तूंमधील अफलाटॉक्सिनची पातळी यावरील कठोर सरकारी नियमांमुळे खाद्य बाजारपेठ आणि निर्यात अर्थव्यवस्थेवर विशेषत: विकसनशील देशांमध्ये लक्षणीय परिणाम होतो

इक्रिसॅटच्या अभ्यासाने जैवरासायनिक प्रक्रियांचा उलगडा झाला आहे, ज्यामुळे एस्परगिलस फ्लेव्हसमुळे होणा-या बुरशीजन्य संसर्गास प्रतिकार करता येतो.

अफलाटॉक्सिनचा कमी करण्यासाठी विविध भौतिक आणि रासायनिक पद्धती अस्तित्वात आहेत, परंतु या पद्धतीऐवजी अधिक प्रतिरोधक वाण विकसित केल्यास, समस्येच्या मुळाशी निराकरण करता येईल तसेच हा सर्वात किफायतशीर उपाय सुद्धा आहे. हा अभ्यास भविष्यात एस्परगिलस संसर्गास पूर्णपणे प्रतिरोधक असलेल्या भुईमुगाच्या जातींच्या प्रजननासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

या अभ्यासाचे निष्कर्ष शेंगदाण्यामधील संसर्ग आणखी कमी करणाऱ्या इतर यंत्रणांसोबत जर एकत्र वापरू शकलो, तर करून अफलाटॉक्सिन-मुक्त शेंगदाण्याकडे वाटचाल करू शकतो

ही पद्धत केवळ अधिक प्रतिरोधक भुईमुगाच्या जातींच्या प्रजननापुरती मर्यादित नाही तर तृणधान्ये, तेलबिया यांसारख्या इतर अन्न पिकांमध्ये सुद्धा समान प्रतिकार यंत्रणा निर्माण करू शकते, जे अफलाटॉक्सिन आणि इतर मायकोटॉक्सिनसाठी अतिसंवेदनशील आहेत.

error: Content is protected !!