IMD Alert । आनंदाची बातमी! ‘या’ जिल्ह्याला आज, उद्या हवामान खात्याचा रेड अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IMD Alert । राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. तरीही उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हा तहानलेलाच आहे. पाऊस नसल्याने या जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. याच जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या जिल्ह्यात पुढील दोन-तीन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन देखील हवामान खात्याने यावेळी केले आहे. या जिल्ह्यात आज सरासरी 30 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. तर उद्या सरासरी 15 मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे. उद्या जिल्ह्यातील अनेक भागात मेघगर्जेनेसह अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

सध्या उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तेर या ठिकाणच्या तेरणा मध्यम प्रकल्पात फक्त 27.60 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. जर या भागात अजूनही पावसाने पाठ फिरवली तर पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकतो. अशातच जुलै महिना निम्मा संपला तरीही पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हवामान खात्याचा अंदाजानुसार जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांवरचे हे संकट टळू शकते. परंतु जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट येऊ शकते. दरम्यान आज हवामान खात्याने पुणे मुंबईसह इतर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला रोजचा हवामान अंदाज घरबसल्या पाहायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा यामध्ये तुम्ही रोजचा हवामान अंदाज पाहू शकता त्याचबरोबर बाजार भाव देखील तुम्हाला अगदी मोफत पाहायला मिळतील. त्यामुळे लगेचच प्लेस्टोर वरून हे ॲप इंस्टॉल करा

error: Content is protected !!