IMD : हवामान विभागाचे अंदाज तंतोतंत खरे ठरतायेत; उपराष्ट्रपतींकडून कौतुक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “एक काळ असा होता जेव्हा भारतीय हवामानशास्र विभागाने (IMD) जारी केलेले पावसाचे अंदाज चुकीचे ठरत होते. मात्र सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून देशातील अनेक भागांमध्ये हवामान विभाग अगदी सेंकदा सेकंदाला तंतोतंत अंदाज वर्तवत आहे.” अशा शब्दांत उपराष्ट्रपती जगदीप धनखरड यांनी हवामान विभागाचे कौतुक केले आहे. भारतीय हवामानशास्र विभागाच्या (आयएमडी) (IMD) 150 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

‘मौसम’ अँपचे लोकार्पण (IMD Forecasts Exactly Accurate)

भारतीय हवामानशास्र विभागाच्या ‘मौसम’ या मोबाइल अँपचे तसेच पंचायत मौसम सेवा, निर्णय समर्थन प्रणाली आणि हवामान सेवांसाठी राष्ट्रीय फ्रेमवर्क या नवीन उपक्रमांचे अनावरण उपराष्ट्रपती जगदीप धनखरड यांच्या हस्ते सोमवारी (ता.१६) नवी दिल्ली येथे करण्यात आले. यावेळी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री किरेन रिजिजू, विज्ञान सचिव एम रविचंद्रन, आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा आणि माजी महासंचालक उपस्थित होते.

आयएमडी हे ‘सुरक्षा जाळे’

सध्या देशातील शेती या प्रमुख क्षेत्रासह आरोग्यसेवा, विमान वाहतूक, ऊर्जा विभाग या सर्वांना हवामान विभागाकडून सर्वव्यापी अंदाज दिला जात आहे. शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी तर सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या जीविताला धोका होऊ नये. अशा प्रत्येक पातळीवर हवामान विभागाचे अंदाज प्रभावी ठरत आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन कार्यात देखील या अंदाजाचा फायदा होत आहे. केवळ हवामान अंदाजच नाही तर राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करून आणि नागरिकांना निसर्गाच्या कोपापासून संरक्षण देणारे आयएमडी हे एक ‘सुरक्षा जाळे’ असल्याचेही उपराष्ट्रपती जगदीप धनखरड यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक भागांमध्ये चक्रीवादळा सारख्या घटना समोर आल्या. या परिस्थितीतही किनारपट्टी भागातील लाखो नागरिकांचे जीव वाचविण्यात हवामान विभागाने मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे आयएमडी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पीठासीन अधिकाऱ्यांसाठी (उपराष्ट्रपती) हवामानाचा अंदाज लावू शकेल, त्या दिवसाची मी वाट पाहत आहे. अशा मिश्किल शब्दात त्यांनी शेवटी हवामान विभागाचे कौतुक केले आहे.

error: Content is protected !!