ऑफ सीझनमध्ये शेतकऱ्याने केली कलिंगडाची लागवड, मिळतोय लाखोंचा नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आपल्या पिकांच्या भावाबाबत चिंतेत असतात. पण जर योग्य माहिती आणि योग्य पद्धतीने शेती केली तर ही समस्या तर दूर होऊ शकतेच आणि फायदेही वाढू शकतात. असेच काहीतरी केले आहे. अन्नता भिकाजी इंगळे या अकोला जिल्ह्यात राहणाऱ्या शेतकऱ्याने. या शेतकऱ्याने आपल्या पाच एकरात कलिंगडाची लागवड ऑफ सिझन मध्ये केली.

सध्या शेतकऱ्याला 17 रुपये किलोचा दर मिळत आहे. आणि यावेळी ट्रकने बंगाल, हैदराबाद, केरळ आणि कन्याकुमारी येथे टरबूज पाठवले जात आहेत. शेतकऱ्याने सांगितले की, 5 एकरात 100 टन टरबूजाचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. आता 17000 रुपये प्रति टन किंमत मिळत आहे. ज्यासाठी त्यांना अडीच लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. ऑफ सिझनमध्ये टरबूज दर्जेदार असल्याने त्याला चांगला भाव मिळत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

पावसामुळे नुकसान

याबाबत शेतकऱ्याने माहिती देताना सांगितले की, त्यांनी यापूर्वी जून आणि ऑगस्ट महिन्यात त्यांच्या 10 एकर जमिनीत कलिंगडाचे पीक घेतले होते. मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. 10 एकरात 150 टन कलिंगडाचे उत्पादन घेतले जाते, मात्र पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे त्यांना केवळ 10 टन उत्पादन मिळाले. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांनी पुन्हा 5 एकरात कलिंगडाची लागवड केली आणि आता त्याला चांगला भाव मिळत आहे.गेल्या पाच वर्षापासून शेतकरी ऑफ सीझनमध्ये कलिंगडाची लागवड करत आहेत. अकोला जिल्ह्यात फक्त अनंता भिकाजी हे ऑफ सिझनमध्ये टरबूजाची लागवड करतात.

अन्नता भिकाजी यांनी सांगितले की, ते फक्त ऑफ सीझनमध्ये कलिंगडाच घेत नाहीत तर पपई आणि खरबूजाचीही लागवड करतात. कलिंगड लागवडीसाठी त्यांना एक एकरासाठी किमान 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. ऑफ सीझनमध्ये त्याची चांगली किंमत मिळते असे भिकाजींनी सांगितले. ते या फळांची लागवड पावसाळ्यात आणि थंड हंगामात करतात. शेतकऱ्याने प्लास्टिक मल्चिंग पद्धतीने शेती केली आहे. आणि यामुळे फळांचा दर्जा चांगला राहतो.

स्रोत टीव्ही ९

error: Content is protected !!