Incentive Subsidy: प्रोत्साहन अनुदानासाठी तब्बल 8.5 लाख शेतकरी अपात्र; जाणून घ्या कारणे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र शासनाच्या प्रोत्साहन अनुदानासाठी (Incentive Subsidy)  चक्क 8.5 लाख शेतकरी अपात्र ठरलेले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा (Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojna) भाग म्हणून देण्यात येणार्‍या प्रोत्साहन अनुदानासाठी अनेक शेतकरी (Farmers) अपात्र ठरले आहेत. यामागे असलेली कारणे जाणून घेऊ या (Incentive Subsidy).

प्रोत्साहन अनुदानासाठी अपात्र ठरण्याची कारणे (Incentive Subsidy)

  • कर्ज घेण्याच्या आणि परतफेडीच्या (Loan Repayment) अटींचे पालन न करणे
  • या योजनेसाठी पात्र होण्यासाठी, शेतकर्‍यांनी तीन आर्थिक वर्षांपैकी दोन वर्षांत कर्ज घेऊन ते परतफेड करणे गरजेचे होते
  • एका वर्षात कर्ज घेऊन परतफेड करणारे 8.5 लाख शेतकरी या अटीमुळे अपात्र ठरले आहेत.
  • करदाते आणि नोकरी करणारे: या योजनेचा लाभ घेण्यासाठी, शेतकरी आयकरदाता (Income Taxpayer) किंवा नोकरी करणारे नसावेत. असे पाच लाख शेतकरी (farmers) या निकषामुळे अपात्र ठरले आहेत.
  • उच्च उत्पन्न: या योजनेचा लाभ घेण्यासाठी, शेतकरी उच्च उत्पन्न गटात (Highest Paying Farmer Group) नसावेत. या निकषामुळे काही शेतकरी अपात्र ठरले आहेत.
  • इतर अपात्रता निकष: माजी मंत्री, आमदार, खासदार आणि इतर निवडक सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना या योजनेचा लाभ घेण्यास मनाई आहे. 25,000 रुपये पेक्षा जास्त पगार असलेले काही कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारीही अपात्र आहेत.

किती शेतकर्‍यांना लाभ झाला (Incentive Subsidy)

एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी अपात्र झाले असले तरी, 14.39 लाख शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरले असून त्यांना 5216 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

एकूण 28.6 लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते, त्यापैकी 14.93 लाख पात्र ठरले होते.

प्रोत्साहन अनुदानाचे पुढील नियोजन

सरकारने अद्याप 1000 कोटी रुपये वितरित करण्याचे बाकी आहे. या योजनेतून वंचित राहलेल्या शेतकर्‍यांसाठी काय तरतूद केली जाईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही (Incentive Subsidy).

error: Content is protected !!