हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात तापमानात वाढ होत असताना, विविध भागात ढगाळ वातावरण होणार असून अवकाळी पाऊस कायम राहणार आहे. आज (ता.४) मे या दिवशी कोंकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी. वेगाने वारे वाहत असून मेघगर्जना आणि विजांसह पावसाची दाट शक्यता असल्याचा हवामान खात्याने (Weather Dept) अंदाज वर्तवला आहे.
राज्यात अवकाळी पाऊस आणि तापमानात वाढ होत असल्याने परभणी जिल्ह्यात काल (ता.३) मे या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात राज्यातील ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे कमाल वातावरणात चढ – उतार पहायला मिळत आहे.
आपल्या गावात किती दिवस पाऊस पडेल जाणून कसे घ्याल?
राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचे सावट आहे. यामुळे हवामानात चढ – उतार होत असून कोणत्या गावात, तालुक्यात काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. हे जाणून घेणं आता सोयीचं झालं आहे. शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲपचे नाव सर्च करा आणि ॲप इंस्टॉल करा. त्यानंतर हवामान अंदाज या पर्यायावर क्लिक करा. आपल्याला आपल्या भागातील हवामानाचा अंदाज एका क्लिकवर मिळवता येऊ शकतो. तसेच सातबारा उतारा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, पशुपालन, सरकारी योजना यांची माहिती एकही रुपये खर्च न करता या ॲपद्वारे मिळवता येईल.
या भागात अवकाळी पावसामुळे हवामान खत्याचे येलो अलर्ट जारी:
कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र, : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.