Indian chilli Prices Likely to Drop: मागणी कमी, साठा जास्त; भारतीय मिरचीच्या किमती कमी होण्याची शक्यता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जागतिक बाजारपेठेत भारतीय मिरचीच्या किमती कमी (Indian chilli Prices Likely to Drop) होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  भारतीय मिरचीचा चीन या सर्वात मोठ्या खरेदीदार आहे, परंतु सध्या चीनकडून कमी झालेली मागणी, शेजारील बांगलादेशने (Bangladesh) म्यानमारकडून मिरची खरेदी करण्यास दिलेले प्राधान्य यामुळे भारतातील लाल मिरचीच्या किमती या हंगामात मंदीत राहिल्यानंतर दबावाखाली येण्याची शक्यता आहे (Indian chilli Prices Likely to Drop).

चीन (China) भारताकडून तेजा जातीची मिरची खरेदी करतात परंतु सध्या चीनकडून मागणी नाही. बाजार उदासीन आहे आणि कोणतीही मोठी निर्यात जवळपासच्या काळात किमान जुलैपर्यंत होण्याची शक्यता नाही,” असे गुंटूरमधील ऑल इंडिया चिली एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष सांबशिवा राव वेलागापुडी यांनी सांगितले.

चीनकडे सध्या मिरचीचा भरपूर साठा (Chilli Stock) आहे आणि पुढील तीन महिन्यांत ते बाजारात परत येण्याची शक्यता नाही. खरं तर, हंगामाच्या सुरुवातीच्या काळात चीनकडून मागणी चांगली होती आणि त्यांनी यावर्षी सुमारे 20-25 टक्के अधिक खरेदी केली आहे, असे वेलागापुडी म्हणाले.

स्पर्धात्मक म्यानमार (Indian chilli Prices Likely to Drop)

भारतीय मिरचीला बांगलादेशातून मागणीचा अभाव (Lack Of Demand) बाजारात जाणवत आहे. बांगलादेशने यावर्षी भारताऐवजी म्यानमारमधून (Myanmar) मिरची सोर्सिंग केले आहे. म्यानमार येथे यावर्षी मिरचीचे पीक आणि  दर्जा चांगला होता आणि ते बांगलादेशला कमी किमतीत विक्री करत आहेत. ज्यामुळे बांगलादेश भारतीय बाजारपेठेपासून (Indian chilli Prices Likely to Drop) दूर राहिले, असे वेलागापुडी म्हणाले.

स्पाइसेस बोर्डाच्या आकडेवारीनुसार 2022-23 दरम्यान बांगलादेश हा चीन आणि थायलंडनंतर भारतीय मिरचीचा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार (Indian Red Chilly Importer)  होता.

वेलागापुडी म्हणाले की, ओलिओरेसिन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात मिरची खरेदी केली आहे आणि त्यांच्या नऊ महिन्यांच्या गरजा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे ते पुन्हा बाजारात खरेदीसाठी येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

वारंगळमध्ये दररोज सुमारे 80,000 पोती आणि गुंटूरमध्ये सुमारे 1 लाख गोण्यांची आवक होते. मार्केटिंगचा हंगाम एप्रिलच्या अखेरीपर्यंत चालू शकतो, वेलागापुडी म्हणाले की, कर्नाटकातील शीतगृहे भरली आहेत, तर आंध्रमध्ये सुमारे 8-9 लाख पिशव्या आणि तेलंगणामध्ये सुमारे 2-3 लाख पिशव्या ठेवण्याची संधी आहे.

निराशाजनक परिस्थिती (Indian chilli Prices Likely to Drop)

कर्नाटकातही दर्जेदार आवक आणि मागणी नसतानाही मिरचीच्या किमतीत आणखी घसरण सुरूच आहे, असे बयादगी येथील मोठे व्यापारी आणि निर्यातदार यांनी सांगितले. मागणीच्या अभावामुळे हंगामाच्या सुरुवातीच्या तुलनेत किंमती सुमारे 50 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत कारण बहुतेक खरेदीदारांनी खरेदी पूर्ण झाली आहे.  

जास्त कॅरी फॉरवर्ड साठा आणि मोठे पीक यामुळे यंदा कर्नाटकच्या बाजारपेठेत मिरचीचे भाव घसरले आहेत. स्पाईस एक्स्ट्रा या सुक्या मिरचीच्या R&D उपक्रमांचे व्यासपीठ असलेल्या बाजारातील आवक यावर्षी विक्रमी उच्चांकावर आहे. स्पाईस एक्स्ट्राचा अंदाज आहे की कर्नाटकातील सुक्या मिरचीची डिसेंबर ते मार्च अखेरपर्यंतची आवक प्रत्येकी 30 किलोग्रॅमच्या 53.60 लाख पिशव्या इतकी आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 35.01 लाख पिशव्यांपेक्षा 53 टक्क्यांनी वाढली आहे. 2021-22 च्या हंगामात, बाजारातील आवक 50.65 लाख पिशव्या इतकी उच्च पातळीवर होती. अलीकडच्या काळात बाजारातील आवक कमी होत असतानाही, किमतीतील अस्थिरता खरेदीदारांना दूर ठेवत आहे असे चित्र दिसत आहे.

error: Content is protected !!