Indo Farm Tractor : शेतकऱ्यांसाठी 60 एचपीचा पॉवरफुल ट्रॅक्टर; वाचा कितीये किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला (Indo Farm Tractor) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. शेतीतील सर्वात महत्वाचे साधन म्हणून ट्रॅक्टरकडे पाहिले जाते. आज शेतीमध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून जवळपास सर्वच कामे सोपी झाली आहेत. त्यामुळे आता तुम्ही देखील पॉवरफुल ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर इंडो फार्म कंपनीचा ‘3060 डीआय एचटी ट्रॅक्टर’ तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. आज आपण या 60 एचपी पॉवरच्या ट्रॅक्टरबाबत (Indo Farm Tractor) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

‘3060 डीआय एचटी ट्रॅक्टर’बद्दल (Indo Farm Tractor For Farmers)

इंडो फार्म कंपनीच्या ‘3060 डीआय एचटी ट्रॅक्टर’ला (Indo Farm Tractor) 4088 सीसी क्षमतेचे शक्तिशाली 4 सिलेंडर इंजिन देण्यात असून, ते 60 एचपी पॉवर निर्माण करते. कंपनीच्या या ट्रॅक्टरला ड्राय टाईप ड्युअल एलिमेंट प्रकारचे एअर फिल्टर देण्यात आला आहे. जो इंजिनची धूळ आणि माती संरक्षण करतो. या इंडो फार्म ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पॉवर 52 एचपी इतकी आहे. कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला खूप चांगल्या क्षमतेची इंधन टाकी पाहायला मिळते. इंडो फार्म 3060 डीआय एचटी ट्रॅक्टरला 1800 किलो वजन उचलण्याची क्षमता देण्यात आली आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरची मजबूत व्हीलबेस निर्मिती केली आहे.

‘3060 डीआय एचटी ट्रॅक्टर’चे फीचर्स

इंडो फार्म कंपनीच्या ‘3060 डीआय एचटी ट्रॅक्टर’ला तुम्हाला ड्युअल ॲक्टिंग पॉवर स्टीयरिंग पाहायला मिळते. ज्यामुळे शेतामध्ये ट्रॅक्टर चालवणे आरामदायी वाटते. कंपनीच्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 रिव्हर्स गीअर्ससह गीअरबॉक्स दिलेला आहे. हा इंडो फार्म ट्रॅक्टर ड्युअल क्लचमध्ये येतो. ज्यास साइड शिफ्ट पार्शल कॉन्स्टंट मेश टाइप ट्रान्समिशनसह उपलब्ध करण्यात आले आहे. कंपनीने या ट्रॅक्टरला ऑइल इमर्स्ड ब्रेक्स दिले आहेत. ज्यामुळे ट्रॅक्टरला तात्काळ नियंत्रणात आणण्यास मदत होते. इंडो फार्म ‘3060 डीआय एचटी ट्रॅक्टरला टु व्हील ड्राइव्हसह उपलब्ध करण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

इंडो फार्म कंपनीच्या ‘3060 डीआय एचटी ट्रॅक्टर’ची एक्स-शोरूम किंमत संपूर्ण देशभरात 8.60 लाख ते 9.00 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. आरटीओ नोंदणी फी आणि रोड टॅक्स वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळा असल्याने या इंडो फार्म ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळी शकते.

error: Content is protected !!