Indoor Plants: सध्या कृत्रिम वस्तूंनी घर सजावट ऐवजी रोपे, बोन्साय झाडे यांचा वापर करून जिवंत सजावटीकडे लोकांचा कल वाढत चाललेला आहे. त्यातच शहरातील छोट्या फ्लॅट सिस्टीममुळे छोटीशी बाग किंवा हिरवळ घरी करता येणे अशक्य आहे. घरातील वातावरण आल्हाददायक करता यावे आणि निसर्गाच्या जरा जवळ जाण्यासाठी ‘इनडोअर प्लांट्स’ (Indoor Plants) ही खूप चांगली कल्पना आहे. ही ‘इनडोअर प्लांट्स (Indoor Plants) फक्त बघायलाच सुंदर दिसतात असे नाही तर बहुतेक झाडे/रोपे घरातील प्राणवायु म्हणजेच ऑक्सिजन वाढविण्यास मदत करतात. काही झाडे/रोपे ही वास्तूसाठी शुभ असतात, तर काही ‘इनडोअर प्लांट्स घरातील नकारात्मकतेला बाहेर काढतात. वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त असणाऱ्या या ‘इनडोअर प्लांट्सच्या योग्य वाढीसाठी त्यांची काळजी सुद्धा वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. ती कशा प्रकारे घ्यायची ते जाणून घेऊ.
कोणती माती वापरावी?: (Soil For Indoor Plants)
इनडोअर प्लांटसाठी ((Indoor Plants) भुसभुशीत आणि जास्त पाणी न साचणारी माती चांगली असते. ही माती जास्त ओलसर किंवा अधिक वाळलेली राहू नये. झाडाची वाढ आणि पोषण होण्यासाठी विशिष्ट कालावधीने माती खणणे, ती बदलणे या गोष्टी कराव्यात.
इनडोअर प्लांट्स पाणी व्यवस्थापन: Water Management)
इनडोअर प्लांट्सला (Indoor Plants) माती ओलसर राहील एवढ्या प्रमाणातच पाणी देणे गरजेचे असते. खूप जास्त प्रमाणात किंवा फारच कमी प्रमाणात पाणी देणे या झाडांना नुकसान करू शकते. एक दिवसाआड किंवा काही दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे, पाण्याचा चांगला निचरा होईल याची काळजी घ्यावी, झाडांना सामान्य तापमानाचे पाणी वापरावे, सोडियमयुक्त पाणी देणे टाळावे.
प्रकाश व्यवस्थापन: (Light For Indoor Plants)
इनडोअर प्लांट्सला (Indoor Plants) तसे बघता प्रकाश कमीच लागतो. ज्या झाडांना थेट प्रकाश नसला तरी चालतो अशी झाडे घरात कोणत्याही जागी लावावीत. परंतु काही झाडांना सूर्यप्रकाश गरजेचा असतो अशी झाडे घराची बाल्कनी किंवा खिडकी जिथे प्रकाश येतो अशा ठिकाणी लावा.
खते/पोषण: (Nutrient Management of Indoor Plants)
घरातील झाडांसाठी (Indoor Plants) जास्तीत जास्त कंपोस्ट किंवा नैसर्गिक अशा सेंद्रिय खतांचा वापर करावा. त्यामुळे योग्य वेळी व योग्य मात्रात देणे गरजेचे असते, जास्त प्रमाणात खते दिल्यास झाडे मरू शकतात. झाड वाढीची अवस्था, फुल आणि फळे येण्याच्या साधारण एक महिना आधी झाडांना द्या. हिवाळ्यात जेव्हा जास्त फुले किंवा फळे येत नाहीत अशावेळी सुद्धा झाडांच्या पोषणासाठी खते द्या. रासायनिक खतांचा वापर टाळा.
योग्य तापमान: (Temperature)
इनडोअर प्लांट्स (Indoor Plants) निवडतांना त्यांना नक्की किती तापमान लागते हे बघणे गरजेचे आहे. झाडे सतत थंड तापमानात ठेवता येत नाही. त्यामुळे ज्या खोलीत झाडे ठेवलेली आहेत तिथे सतत एसी लावून ठेवू नका, कारण झाडांना उष्णतेची सुद्धा गरज असते. शक्यतो झाडांना सामान्य तापमानात ठेवावे.
पाण्याचा योग्य निचरा (water Drainage): झाडे लावतांना सेंद्रिय मातीचा वापर करा, व कुंड्यांच्या बुडाला पाणी निचरा होण्यासाठी योग्य आकाराची भोक पाडा. भोकं बुजलेली नाहीत याची वेळोवेळी पाहणी करा.
रिपॉटिंग करणे ( Re- Potting):
जुनी झाडे मोठ्या कुंड्यात लावणे यालाच रिपॉटिंग म्हणतात. रिपॉटिंग करतांना मात्ती बदलावी, घरी निर्मित केलेली किंवा बाजारात विकत मिळणारी सेंद्रिय माती वापरावी, त्यात किडी वगैरे नाही याची खात्री करावी. रिपॉटिंग करतांना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
रोपांची/ झाडांची छाटणी (Pruning):
सर्वच इनडोअर प्लांट्सना छाटणी करण्याची गरज नसते परंतु काही झाडे भांड्यांच्या आकारानुसार वाढत गेली तर त्यांची छाटणी करावी.
पानांची स्वच्छता: बरेचदा पाने पिवळी पडतात आणि गळतात, अशी पाने काढून टाका. पानांवर धूळ किंवा माती जमा झाली असल्यास पाण्याचा स्प्रे मारून स्वच्छ करा.
कीटकांपासून सुरक्षा: ( Protection From Pest)
इनडोअर प्लांट्सवर (Indoor Plants) कीटकांचा प्रादुर्भाव असल्यास सेंद्रिय कीटकनाशक किंवा पावडरचा स्प्रे करून त्यांचा नायनाट करा. दर दोन आठवड्यांनी किंवा प्रादुर्भाव बघून गरजेनुसार फवारणी करा.