हॅलो कृषी ऑनलाईन : तांदूळ उत्पादनात चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. तांदळाच्या जाती (Indrayani Rice) वेगवेगळ्या देशांमध्ये आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलत असतात. उत्पादन, गुणवत्ता आणि चवीनुसार शेतकरी विविध जातींची (Indrayani Rice) लागवड करतात. भारताविषयी बोलायचे झाले तर येथे अनेक प्रकारच्या भाताची लागवड केली जाते. वापर लक्षात घेऊन भाताच्या विविध जातींची लागवड केली जाते. या लेखात आपण सुगंधित अशा भाताच्या इंद्रायणी जातीबद्दल जाणून घेऊ या…
इंद्रायणी तांदळाची विशेषतः? (Indrayani Rice Variety For Cultivation)
या जातीच्या तांदळाची लागवड महाराष्ट्राच्या पश्चिम भागात केली जाते. ही आंबेमोहर तांदळाची संकरित जात आहे. हा भात साधा भात, मसाला भात तयार करण्यासाठी वापरला जातो. इंद्रायणी तांदूळ ही जात मध्यम आकाराची व चिकट असते. हे एक सुगंधी तांदूळ आहे. ज्याची लागवड पुण्यातील मावळ भागात केली जाते. खाद्यप्रेमींमध्ये हा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्याय आहे. त्याची स्वतःची खास गोड चव आणि सुगंध आहे. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. तांदळाच्या सुगंधी गुणवत्तेमुळे तो विशेषतः मांसाहार करणार्यांच्या पसंतीस उतरतो. अर्थातच शाकाहारी लोकांनाही तो आवडतो.
ग्लायसेमिक इंडेक्स किती?
इंद्रायणी तांदळात भरपूर चांगल्या गोष्टी असतात ज्या तुमच्या शरीराला मदत करू शकतात. जसे की जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर. भाताची ही जात मध्यम आकाराची व चिकट असते. तसेच त्याला एक गोड सुगंध आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 45-52 दरम्यान कमी आहे. त्यामुळे हा भात मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगला मानला जातो.