बीड जिल्ह्यात तूर पिकावर किडींचे आक्रमण; शेतकरी चिंताग्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न संपण्याचे नाव घेत नाहीत. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचवेळी बीड जिल्ह्यात तूर पिकांवर किडींचे आक्रमण वाढत आहे. अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांची पिके वाचली. मात्र आता किडीच्या आक्रमणामुळे पिके उद्ध्वस्त होत आहेत. जिल्ह्यातील तूर पिकात फुले आली, तेव्हाच पिकांवर रस शोषक किडींनी आक्रमण केल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.

सध्या जिल्ह्यात तूर पीक पूर्ण बहरात आहे. मात्र यंदा तुरीवर सुरवंटांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तूर लागवडीवर भर दिला आहे. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र यावेळी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांचा खर्च वाढत आहे.

कृषी विभागाने दिला सल्ला

जिल्ह्यात यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, भाजीपाला या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची तयार केलेली पिके पाण्यात सडली. या लागवड भागात जास्त काळ पाणी उभे राहिल्याने तूर पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो आहे. यातून शेतकरी वाचला पाहिजे. तुर पिकाच्या देठावर योग्य औषध फवारणी केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

मिरची पिकांवर ब्लॉक थ्रीप्सचा हल्ला

वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडींचे आक्रमण वाढत आहे. मराठवाडा आणि विदर्भाला याचा विशेष फटका बसला आहे.पाऊस पडल्यानंतर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी अधिक चिंतेत आहेत. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यात मिरची पिकांवर ब्लॅक थ्रीप्स किडीचे आक्रमण वाढत आहे. तर भंडारा जिल्ह्यात धान पिकावर किडींच्या हल्ल्याने हैराण झालेले शेतकरी आपले भातपीक जाळून टाकत आहेत.

error: Content is protected !!