Interim Budget 2024 Highlights: अंतरिम बजेटमध्ये कृषी उद्योग आणि योजनांवर भर; अर्थमंत्री यांनी मांडला सरकारच्या मागील कार्याचा आढावा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: निर्मला सितारामन यांनी आज सदर केलेल्या अंतरिम बजेटमध्ये (Interim Budget 2024 Highlights) कृषी उद्योग आणि शेतकर्‍यांवर भर देण्यात आलेला आहे. दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीची योजना तसेच तेलबियांमध्ये देशाला स्वावलंबी करण्यासाठी धोवेगवेगळी धोरणे आखली जातील असे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी घोषणा केली आहे.

वेगवान विकासासाठी नवीन आर्थिक धोरणे आखली जात आहेत. ३८ लाख शेतकऱ्यांना पीएम संपदा योजनेचा लाभ झाला आहे. पीएम मत्स्य योजना अंतर्गत ५५ लाख नवीन नोकऱ्या देणार असल्याचीही घोषणा (Interim Budget 2024 Highlights) त्यांनी केली.

शेतकऱ्यांसाठी केलेले काम (Work For farmers)

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी खूप काम करत आहेत आतापर्यंत पीएम पीक विमा योजनेतून ४ कोटी शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. असेही त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारने शेतमालाची मूल्यसाखळी उभारणीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे पीक काढणीनंतर होणारे नुकसान कमी झाले. जास्तीचे उत्पादन देणाऱ्या वाणांच्या निर्मितीसाठी संसाधन आणि कृषी तंत्रज्ञानाची जोड दिली. तसेच बाजारपेठ, शेतमालाची खरेदी आणि प्रक्रिया उद्योगाची जोड दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादकता सुद्धा वाढली, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प (Interim Budget 2024 Highlights) सादर करताना सांगितले आहे.

२०२२ ला सुरू करण्यात आलेल्या आत्मनिर्भर तेलबिया अभियान अंतर्गत मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ आणि भूईमूग इत्यादी पिकांचा समावेश केला गेला व यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. तसेच नॅनो युरियाच्या वापराला दिलेल्या प्रोत्साहनमुळे युरियाचा वापर परिणामकारक ठरत आहे असेही त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेतून आतापर्यंत ३८ लाख शेतकऱ्यांना फायदा झाल्याचा अर्थमंत्री सीतारामन यांनी दावा केला. तसेच दूध उत्पादकता वाढवण्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिल्याचे त्या म्हणाल्या.

गरीबांसाठी सरकारचे कार्य (Interim Budget 2024 Highlights)

सरकारने सर्वांगीण विकासाला प्राधान्य देताना सर्वांसाठी घर, प्रत्येक घराला पाणी, सर्वांसाठी बँक खाते आणि आर्थिक सेवा यावर काम केले आहे. ८० कोटी लोकांना मोफत रेशन देऊन अन्न संकटही संपवले आहे.

गरिबांना घरे देण्याच्या योजनेत केंद्र सरकार ३ कोटी घरांचे उद्दिष्ट गाठण्याच्या जवळ आहोत. पुढील ५ वर्षांत आणखी २ कोटी घरे बांधली जातील. छतावरील सौरऊर्जेसाठी १ कोटी घरांवर सौर पॅनेल बसवण्यात येणार आहेत. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा प्रसंगी पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली होती त्याची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत.

या १० वर्षात सरकारने २५ कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केले आहे. अशा लोकांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जन धन खात्यातून लाखो रुपये लोकांच्या हातात देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असे निर्मला सितारामन  यांनी सांगीतले.

लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Yojana)

लखपती दीदी योजनेंतर्गत सुमारे एक कोटी महिला लखपती झाल्या आहेत. पूर्वी असलेले २ कोटी लखपती दीदींचे टार्गेट वाढवून ३ कोटी करण्यात येत आहे. महिलांच्या विकासावर आपले सरकार विशेष लक्ष देत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

महिला आरक्षणाच्या माध्यमातून जीडीपीचा उल्लेख (Women Reservation)

सरकार प्रशासन, विकास आणि कामगिरीवर भर देत असतानाच मोदी सरकारने महिलांना विशेष महत्व देताना   महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्यात आले आहे. देशाची अर्थव्यवस्था चांगली चालली आहे. देशातील जनता चांगली कमाई करत आहे. योजनांची वेळेवर अंमलबजावणी होत आहे.

मोदी सरकारचे शैक्षणिक क्षेत्रातील यश (Interim Budget 2024 Highlights)

गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारने ३ हजार नवीन आयटीआय, ७ आयआयटी, १६ आयआयआयटी, ७ आयआयएम, १५ एम्स आणि ३९० विद्यापीठे स्थापन केली आहेत. सरकारच्या या योजनांद्वारे खूप बदल झाले आहेत.

देशात पुढील ५ वर्षे विकासाची गंगा वाहणार (Interim Budget 2024 Highlights)

कोविड नंतर एक नवीन जागतिक व्यवस्था तयार झाली आहे. अत्यंत कठीण काळात भारताने G-20 चे अध्यक्षपद स्वीकारले. कमी विकास दर आणि हवामान बदल यासारख्या समस्यांशी जग झगडत होते. तर या सर्व गोष्टींना न जुमानता भारत आपली वाटचाल करण्यात यशस्वी झाला. भारत-मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर ही एक मोठी उपलब्धी आहे. या कॉरिडॉरमुळे व्यवसाय वाढणार आहे. सर्वांच्या विश्वासातून पुढील ५ वर्षे विकासाची गंगा वाढणार आहे असेही त्या बजेट (Interim Budget 2024 Highlights) सादर करताना म्हणाल्या.

error: Content is protected !!