Irrigation Project : शेतीसाठी ‘या’ जिल्ह्यात साखळी बंधारे उभारणार; मुख्यमंत्र्यांची माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसह औदयोगिक विकासासाठी पाणी (Irrigation Project) आणि वीज हे घटक खूप महत्वाचे आहेत. ज्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेती क्षेत्राचा विकास कारण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात पूर्णा, पैनगंगा व अन्य नद्यांवर साखळी बंधाऱ्यांची साखळी तयार केली जाईल. त्याद्वारे हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढला जाईल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे (Irrigation Project) लोकार्पण करण्यात आले. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, संतोष बांगर, यांच्यासह अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता.

सिंचन प्रकल्पांवर विशेष भर (Irrigation Project Dam Chain Hingoli District)

हिंगोली जिल्ह्यात पूर्णा नदीवर बंधारे बांधण्यात यावे. यासाठी अनेकदा आंदोलने झाली. मात्र, सध्या शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन प्रकल्पांवर (Irrigation Project) विशेष भर देत आहे. त्यामुळे आगामी काळात हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्ह्यात सिंचनासंदर्भातील अनेक प्रयोग केले जातील. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात कयाधू नदीला कालव्याद्वारे जोडण्याचे काम केले आहे. याबाबतचा प्रकल्प लवकरच हाती घेतला जाणार आहे. तसेच पैनगंगा नदीवर देखील एकूण सात बंधारे बांधले जाणार आहेत. ज्यामुळे 50 हजार एकर सिंचन क्षमता निर्माण होऊन, त्याचा शेतकऱ्यांसह औद्योगिक विकासासाठी मोठ्या फायदा होणार आहे. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहे.

हळद संशोधन केंद्राला 100 कोटी निधी

सामान्य कार्यकर्ता, शेतकऱ्याचा मुलगा आज तुमच्या सर्वांमुळे मुख्यमंत्री झाला आहे. सीएम म्हणजे मुख्यमंत्री नव्हे तर सीएम म्हणजे तुमच्यासारखा कॉमन मॅन आहे. असे म्हणत त्यांनी आपले सरकार सामान्यांतल्या सामान्यासाठी योजना, निर्णय घेत असून, त्याची गतिशील अंमलबजावणी करत आहे. हे सर्व निर्णय गोरगरीब जनता, शेतकरी व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारे आहेत. 885 कोटी रुपये खर्च करून हिंगोलीला वैद्यकीय महाविद्यालय उभे राहत आहे. हळद संशोधन केंद्रासाठी 100 कोटी निधी दिला आहे. आणखीही त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहे.

error: Content is protected !!