Irrigation Rotation : शेतकऱ्यांना विचारात घेऊन पाण्याचे नियोजन करा – भुसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी परतीचा पाऊस (Irrigation Rotation) समाधानकारक झाला नाही. पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांमधून पुढील वर्षी ऑगस्टअखेरपर्यंत पाणी पुरेल, याप्रमाणे नियोजन करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी पाण्याचा जपून वापर करावा. तसेच शेतकऱ्यांना विचारात घेऊन सिंचन आवर्तनाचे (Irrigation Rotation) नियोजन करावे. अशा सूचना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आज (ता.24) नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, नितिन पवार, डॉ. राहुल आहेर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य, पाणी वापर संस्थांचे अधिकारी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सिंचनासाठी असेल समिती (Irrigation Rotation In Nashik)

भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता शेतकरी व नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. धरण समूह व पाणी प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठी लक्षात घेता शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन देण्याच्या दृष्टीने येत्या दोन दिवसांत लोकप्रतिनिधी, अधिकारी व शेतकरी यांची समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीद्वारे पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याच्या आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे आवर्तन सोडतांना पाण्याचा अपव्यय होणार नाही. यादृष्टीने ज्या ठिकाणी कालव्यांची दुरूस्ती आवश्यक आहे ती तातडीने करण्यात यावी. अशा सूचनाही भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या प्रकल्पांचा घेतला आढावा

पालकमंत्री भुसे यांनी बैठकीदरम्यान चणकापूर प्रकल्प, पालखेड प्रकल्प, ओझरखेड प्रकल्प, कडवा प्रकल्प, गंगापूर प्रकल्प यांच्यातील उपलब्ध पाणीसाठा व त्यांचे नियोजन याबाबतचा आढावा घेतला. यावेळी बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी पाणी वापराबाबत महत्वाच्या सूचना केल्या आहेत. या सूचना विचारात घेवून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

error: Content is protected !!