ISO Seminar : ३२ व्या साखर चर्चासत्राचे २१, २२ नोव्हेंबरला आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय साखर महामंडळाकडून २१ व २२ नोव्हेंबर २०२३ रोजी लंडन येथे ३२ व्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन (ISO Seminar) करण्यात आले आहे. ‘ऊर्जा, किंमती, भू-राजनीती, जटिल नियम आणि नाविन्योपक्रमाच्या संधी’ अशी यावेळीच्या चर्चासत्राची थीम असणार आहे. या वर्षीच्या चर्चासत्राचे अध्यक्ष हे ब्राझीलच्या नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज (CNI) चे उपाध्यक्ष पेड्रो रॉबेरियो डी मेलो नोगुएरा हे असणार आहेत.

आंतरराष्ट्रीय साखर महामंडळ ही साखर क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संस्था असून, ती जागतिक पातळीवरील साखरनिर्मिती संबंधित वाद-विवाद, माहितीचे विश्लेषण, साखर उत्पादनासंदर्भात विशेष अभ्यास, सांख्यिकी आकडेवारी प्रसिद्ध करणे, तसेच चर्चासत्रे, परिषदा आणि कार्यशाळांद्वारे जागतिक साखर बाजारातील परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचे काम करते. यावर्षीच्या चर्चासत्रात ‘हरित ऊर्जा’ या विषयावर भारतातर्फे निराणी शुगर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विजय निराणी संबोधित करणार आहेत. याशिवाय जगभरातील ऊस, साखरेबाबतच्या महत्त्वाच्या विविध विषयांचे प्रतिनिधीत्व करणारे वक्ते या परिषदेत सहभागी होणार आहेत.

उत्पादनातील घटीवर चर्चा?

यावर्षी जागतिक साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेचे भाव १२ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहचलेले आहेत. यावर्षी कमी पाऊस आणि दुष्काळी स्थितीमुळे भारत आणि थायलंडमध्येही साखर उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. केवळ ब्राझीलमध्येच यावर्षी साखर उत्पादनात काहिशी वाढ होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त एकूणच जागतिक साखर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज असून साखरेच्या दरात वाढ होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या चर्चासत्रात काय चर्चा होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!