Israeli Farming : ‘या’ जिल्ह्यात पंखे-कुलरद्वारे होतीये शेती; मातीची गरजच नाही!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या (Israeli Farming) मदतीने शेतीत क्रांती घडवून आणत आहे. पारंपारिक शेतीपेक्षा त्यातून त्यांना अधिक उत्पादनही मिळत आहे. मात्र आता देशातील वाळवंटी भाग म्हणून ओळख असलेल्या राजस्थानमध्ये शेतकऱ्यांनी इस्राईली तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती फुलवली असल्याचे समोर आले आहे. राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यामध्ये ही शेती केली जात असून, या आधुनिक शेतीची (Israeli Farming) सध्या देशभर चर्चा होत आहे.

भिलवाडा येथील शेतकऱ्यांनी इस्राईली तंत्रज्ञानाच्या (Israeli Farming) मदतीने देशविदेशातील 30 प्रकारच्या फळे व भाजीपाल्याची लागवड केली आहे. लागवडीनंतर तापमान 15 ते 25 अंशादरम्यान ठेवण्यासाठी कूलर आणि पंख्यांचा वापर केला जात असून, हे शेतकरी विना मातीची शेती करत आहे. या ठिकाणी उत्पादित होणारे फळे आणि भाजीपाला दिल्ली, गुजरात, मुंबईसह देशातील अन्य बाजारांमध्ये पाठवला जात आहे. ज्यातून या शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात फायदा होत असून, हे शेतकरी प्रामुख्याने बाजारभाव आणि ऑफ सीझन पाहून त्या-त्या फळे व भाजीपाल्याचे पीक घेत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना अधिक दराने इस्राईली तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करून, लाखो रुपयांचा नफा मिळत आहे.

काय आहे इस्राईली तंत्रज्ञान? (Israeli Farming Using Fan Cooler In Bhilwara)

इस्राईली तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्यासाठी भिलवाडा येथील शेतकऱ्यांनी मोठे स्टॅन्ड उभारले आहेत. ज्यामध्ये कायमस्वरूपी पाणी वाहत असते. या पाण्यामध्ये फळे आणि भाजीपाला पिकांना कॅल्शियम, मँग्नेशियम, सल्फर, आयर्न आणि अन्य पोषक तत्वे दिली जातात. या शेतीच्या तंत्रज्ञानासाठी सर्वसामान्य शेतीच्या तुलनेत केवळ 20 टक्के पाणी लागत असून, 80 टक्के पाण्याची बचत होते. त्यामुळे आता इस्राईली तंत्रज्ञानआधारित ही शेती येथील शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरली आहे.

कूलर, पंख्यांचा वापर

या शेतीबाबत बोलताना एका शेतकऱ्याने म्हटले आहे की, राजस्थानातील संगम यूनिवर्सिटीच्या मार्गदर्शनातून ही शेती केली जात आहे. या शेतीमध्ये टोमॅटो, स्ट्रॉबेरी, काकडी या फळपिकांसह जवळपास 30 प्रकारची भाजीपाला पिके घेतली जात आहे. कमी जागेत आणि कमी पाण्याच्या वापरातून ही शेती फुलवली जात असून, यामध्ये मातीचा कोणताही वापर करण्यात आलेला नाहीये. नर्सरीमध्ये तयार केलेली रोपे यासाठी वापरली जात असून, या पिकांना लागवडीनंतर तापमान 15 ते 25 अंशादरम्यान ठेवण्यासाठी कूलर आणि पंख्यांचा वापर केला जात आहे.

error: Content is protected !!