हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्याकडे सध्या पारंपरिक पद्धतीने गुळनिर्मिती केली जाते. ग्रामीण भागात हा (Jaggery Business) शेतकऱ्यांसाठी विशेषतः तरुण शेतकऱ्यांसाठी हा खूप चांगला व्यवसाय आहे. तुम्हीही हा व्यवसाय आधुनिक पद्धतीने करण्याचा विचार करत असाल तर आपण आज आधुनिक पद्धतीने गुळनिर्मिती (Jaggery Business) कशी केली जाते. याची माहिती जाणून घेणार आहोत.
पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या गूळ निर्मितीसाठीचा (Jaggery Business) उत्पादन खर्च व त्याची गुणवत्ता यामध्ये खूप सुधारणा होणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने लखनऊ येथील राष्ट्रीय ऊस संशोधन संस्थेने गूळ निर्मितीची आधुनिक पद्धती विकसित केली आहे. या पद्धतीमुळे उत्पादन खर्च निम्म्याने कमी करत, गुणवत्ता संवर्धन करता येणार आहे. त्यामुळे आता या नवीन तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात चांगल्या गुणवत्तेचा गूळ तयार करत वर्षाला लाखोंची कमाई करता येणार आहे.
रोज 10 क्विंटल गूळ निर्मिती (Jaggery Business Modern Method)
राष्ट्रीय ऊस संशोधन संस्थेने प्रतिदिन 10 क्विंटल गूळ निर्मिती करण्यासाठी 3 भट्ट्याचे मॉडर्न युनिट उभारले आहे. यासाठी त्यांनी 100 स्वेअर फुट जागा निश्चित केली आहे. याशिवाय ऊस ठेवण्यासाठी आणि भट्टीतील माल सुकविण्यासाठी त्यांनी 200 स्वेअर फुट जागा निर्धारित केली आहे. या ठिकाणी गुळनिर्मिती प्रक्रियेतील सर्वात पहिली मशिनरी ही क्रशर असून, ज्याद्वारे मोठया प्रमाणात उसाचा रस काढला जातो. त्यासाठी ऊसाला स्वच्छ केले जाते. ऊस तोडणी केल्यानंतर तत्काळ 6 ते 12 तासांच्या आत उसाचे गाळप केले जाते. ज्यामुळे चांगल्या प्रतीचा रस मिळण्यास मदत होते.
20 ते 25 किलो अधिक रस
बाजारात सध्या मॉडर्न ऊस क्रशर मशीन उपलब्ध आहे. जी 100 किलोपर्यंत रस तयार करते. मात्र जुन्या क्रशर मशीनच्या माध्यमातून केवळ 45 किलो रस मिळवणे शक्य होते. ही मशीन 10 एचपीची असते. रसनिर्मितीनंतर पुढील टप्पा असतो तो रस सुकवण्याचा. ज्यासाठी लखनऊ येथील संस्थेने तीन लेअर असलेली विशेष भट्टी विकसित केली आहे. जी तुम्हाला कमी वेळात, कमी खर्चात गूळनिर्मिती करून देणार आहे. या सर्व गोष्टींना पूर्वी 2 तास लागायचे, मात्र तेच काम केवळ 30 ते 35 मिनिटात होत असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
आकर्षण रंग आणि टिकाऊ
उसाचा रस सुकवताना त्यात मोठ्या प्रमाणात केमिकल वापरले जाते. मात्र त्याऐवजी वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर करत आकर्षक गूळ बनवण्यास मदत होते. यामध्ये जंगली भेंडीचा वापर केला जाऊ शकतो. एक हजार लिटर ऊस रसासाठी 2 किलो भेंडीच्या रसाचे प्रमाण असावे. गुळामध्ये कडकपणा आणण्यासाठी एरंड किंवा शेंगदाणा यांचे 200 मिली तेल टाकावे. उसाच्या रसाचे तापमान 97 अंश सेल्सिअस होईल. तेव्हा त्यात 250 ग्राम चुना टाकावा. ज्यामुळे गुळाला आकर्षक रंग आणि त्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी मदत होते, असेही संस्थेने म्हटले आहे.
30 ते 35 लाखांच्या उत्पन्नाची हमी
संस्थेकडून 200 ते 250 किलो क्षमतेच्या युनिट उभारणीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. आपणही या पद्धतीने गुळनिर्मिती उद्योग उभारण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला जवळपास 15 लाखांची गुंतवणूक खर्च करावा लागू शकतो. ज्या माध्यमातून दररोज 10 क्विंटल गुळाची निर्मिती केली जाऊ शकते. तुम्ही या युनिटच्या माध्यमातून वर्षातील 200 दिवस जरी काम केले तरी 2000 हजार क्विंटल गूळ तयार केला जाऊ शकतो. ज्याद्वारे खर्च वजा जाता तुम्हाला वार्षिक 35 ते 40 लाखांची कमाई होऊ शकते.