Jaggery Business : गूळ तयार करण्यासाठी योग्य ऊस कसा ओळखायचा? वाचा… सविस्तर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड (Jaggery Business) केली जाते. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश हे दोन राज्य देशातील आघाडीवरील ऊस उत्पादक राज्य आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये साखरनिर्मिती व्यवसाय आणि गूळ निर्मिती व्यवसाय चांगलाच बहरला आहे. मात्र आता गूळनिर्मिती करताना उसाची पारख कशी करायची? असा प्रश्न गुऱ्हाळ चालवणाऱ्या शेतकऱ्यांसमोर असतो. साधारपणे शेतकरी पारंपरिक पद्धतीने अंदाज लावत ऊसाची निवड करतात. हे चुकीचे असून शेतकऱ्यांना त्यातून आर्थिक तोटा संभवतो. याच पार्श्वभूमीवर नेमकी गूळनिर्मिती व्यवसाय (Jaggery Business) करताना काय काळजी घेतली पाहिजे? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

ब्रिक्स मीटर वापरावे (Jaggery Business Tips)

गूळनिर्मिती व्यवसायातील (Jaggery Business) तज्ज्ञांच्या मते, ज्या उसाच्या माध्यमातून गूळनिर्मिती केली जाणार आहे. त्याची निवड करताना शेतात तोडणीच्या आधीपासूनच काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी 1200 रुपयांना मिळणाऱ्या ब्रिक्स मीटर खरेदी करावे. या मीटर तुम्ही वापरात असलेल्या उसाच्या रसाचे काही थेंब टाकून बघावेत. या मीटरमध्ये तुम्हाला आकाशी आणि सफेद असे दोन रंग दिसले. किंवा मग या मीटरमध्ये रसाची व्हॅल्यू ही 20 हुन अधिक असेल तर तो ऊस गूळनिर्मितीसाठी सर्वोत्तम मानला जातो.

गाळपादरम्यान घ्या ‘ही’ काळजी

इतकेच नाही तर गूळनिर्मितीसाठी उसाची तोडणी केल्यानंतर हा ऊस अधिक काळ तसाच न ठेवता. त्याचे २४ तासांच्या आत गाळप होणे आवश्यक असते. याशिवाय गाळपाला काहीसा वेळ असेल तर तोडणी करून आणलेला ऊस उन्हात ठेवू नये. यामुळे प्रत्येक दोन तासाला उसातील 2 टक्के सुक्रोजची घट होते. हे गूळनिर्मिती साठी खूप नुकसानदायी ठरू शकते. त्यामुळे सकाळी आणल्यानंतर दिवसभरात त्या उसाचे गाळप होणे गरजेचे असते.

आर्थिक नुकसान टळते

आता गाळपानंतर पुढील प्रक्रिया गूळनिर्मितीसाठी रस कढईत टाकण्याची असते. उसाचा कढईत टाकल्यानंतर त्यातील सुक्रोज हे ग्लूकोज आणि फ्लोक्टोजमध्ये रूपांतरित होऊ नये. म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. यासाठी तुरटीचा वापर देखील केला जाऊ शकतो. किंवा मग संबंधित उसाच्या रसाचा पीच देखील जाणून घेतला जाऊ शकतो. तो 6.4 ते 6.8 दरम्यान असणे आवश्यक असते. संपूर्ण गूळनिर्मिती प्रक्रिया दरम्यान खूप काळजी घ्यावी लागते. मात्र, या त्यातील काही महत्वाच्या स्टेप्स आहेत. ज्या गूळनिर्मिती व्यवसायातील तोटा कमी करण्यास अर्थात आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होते.

याशिवाय शेतकऱ्यांनी उसाचा रस काढण्यासाठी हॉरिजॉन्टल क्रॉशर (आडवे रस यंत्र) वापरले पाहिजे. ज्यामुळे 10 टक्के अधिक रस मिळण्यास मदत होते. इतकेच नाही तर कढईमध्ये रस उकळवताना 114 डिग्रीपर्यंत उकळला पाहिजे. त्यापेक्षा अधिकही नको आणि कमीही नको. या योग्य तापमानात रस उकळल्यास त्यातून उत्तम प्रतीचा गूळ बनतो. साखर कारखान्यात साखर तयार करण्यासाठी 121 डिग्रीपर्यंत उसाचा रस उकळला जातो.

error: Content is protected !!