Jalyukta Shivar Abhiyan : दुष्काळातही जलयुक्त शिवार अभियानाने तारले – देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या पावसावर एल निनोचा प्रभाव असल्याने राज्यात खूपच कमी पाऊस (Jalyukta Shivar Abhiyan) झाला. मात्र अशा दुष्काळी परिस्थितीतही राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गावागावात पाणी उपलब्ध करू देता आले. त्यानुसार आता राज्यात जलक्रांती घडवायची असेल तर जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नाशिक येथे राज्य सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत जलरथ अभियानाचे (Jalyukta Shivar Abhiyan) फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ (Jalyukta Shivar Abhiyan In Maharashtra)

जलयुक्त शिवार योजना (Jalyukta Shivar Abhiyan) पहिल्या टप्प्यात राज्यातील २२ हजार गावांपर्यंत पोहचली आहे. या योजनेमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्याचा भूजल स्तर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच या योजनेच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी धरणांतून गाळ वाहून नेल्याने, त्यांच्या शेतीचा पोत सुधारून ती सुपीक बनली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत मोठी वाढ झाली आहे. विशेष बुलढाण्यासारख्या जिल्ह्यात नेहमीच दुष्काळी परिस्थिती असायची, मात्र आज त्या ठिकाणी शेतकरी फळ पिकांचे उत्पादन घेत आहे. असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलजीवन मिशनच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले आहे.

संकटाला संधी मानून काम सुरु

जलयुक्त शिवार अभियानाच्या (२.०) दुसऱ्या टप्प्याला देखील राज्य सरकारकडून सुरुवात करण्यात आली आहे. यावर्षी एल निनोचे वर्ष आहे, मात्र सरकारने हीच गोष्ट लक्षात घेता जलस्त्रोत सुकलेले असताना, त्यातून माती व गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. राज्य सरकारने या संकटाला संधी मानून जलयुक्त शिवार अभियानाच्या (२.०) दुसऱ्या टप्प्या आतापर्यंत जवळपास 409 जलसाठ्यांचे कमी पूर्ण केले आहे. ज्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल

यंदा जलयुक्त शिवार अभियानाच्या (२.०) दुसऱ्या टप्प्यात राज्यात 24 हजार गावात काम होणार असून, 16 हजार 405 पाणी साठे गाळ काढून पुनर्जीवित होणाार आहेत. याचा फायदा 3 लाख 20 हजार शेतकऱ्यांना थेट होणार आहे. 267 लाख टँकर भरतील इतका पाणीसाठा याद्वारे तयार होणार आहे. अशा नियोजनातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल यात शंका नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!