Jayakwadi Dam : पाणीसंकट… जायकवाडी धरण 18 टक्क्यांवर; गेल्या वर्षी निम्मे भरले होते!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात महत्वाच्या धरणांची (Jayakwadi Dam) पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. सध्याच्या घडीला राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 35.45 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 44.30 टक्के इतका होता. तर राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडी धरणात देखील सध्या केवळ 18 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच कालावधीत जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) निम्म्याहून अधिक भरलेले होते..

मराठवाड्यात भीषण टंचाई (Jayakwadi Dam Water Storage Today 8 April 2024)

अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात सध्या मराठवाडा विभागात सर्वात भीषण पाणीटंचाईचे संकट आहे. औरंगाबाद विभागात सध्या केवळ 17.97 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 44.31 टक्के इतका होता. तर सध्या इतर विभागांच्या तुलनेत कोकण विभागात सर्वाधिक 48.79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 50.30 टक्के इतका होता. याशिवाय सध्या अमरावती विभागामध्ये 47.67 टक्के पाणीसाठा, नागपूर विभागात 47.08 टक्के पाणीसाठा, नाशिक विभागामध्ये 36.35 टक्के तर पुणे विभागामध्ये 33.65 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अर्थात यंदा सर्वच विभागांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा असल्याचे आकडेवारीतून पाहायला मिळत आहे.

राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा

राज्यातील धरणांची (Jayakwadi Dam) खाली दिलेली कंसातील आकडेवारी मागील वर्षीचा तर कंसाबाहेरील आकडेवारी ही धरणांमधील सध्याचा पाणीसाठा दर्शविते.

औरंगाबाद विभागातील धरणे

  • जायकवाडी 18.03 (52.36)
  • येलदरी 36.46 (0.00)
  • सिद्धेश्वर 19.82 (19.49)
  • नागझरी 9.48 (1.38)
  • लोअर दुधना 6.52 (42.07)

पुणे विभागातील धरणे

  • खडकवासला 56.00 (51.31)
  • टेमघर 8.19 (8.81)
  • मुळशी 42.52 (39.98)
  • कोयना 44.27 (46.55)
  • उजनी 0.00 (22.29)

नाशिक विभागातील धरणे

  • भंडारदरा 40.34 (76.73)
  • गंगापूर 45.64 (50.63)
  • गिरणा 30.97 (30.31)
  • दारणा 24.48 (93.24)
  • चणकापूर 12.92 (82.46)

नागपूर विभागातील धरणे

  • गोसीखुर्द प्रकल्प 44.27 (25.40)
  • कामठी खैरी 56.52 (86.36)
  • तोतलाडोह 59.55 (66.30)
  • लोअर वर्धा 53.53 (56.85)

अमरावती विभागातील धरणे

  • काटेपूर्णा 28.06 (51.05)
  • अप्पर वर्धा 50.73 (49.84)
  • नळगंगा 28.97 (45.96)
  • बेंबळा 36.49 (42.55)

कोकण विभागातील धरणे

  • मध्य वैतरणा 13.07 (14.15)
  • मोडकसागर 44.08 (52.31)
  • तानसा 51.87 (54.37)
  • भातसा 43.59 (47.57)
  • घाटघर 32.10 (52.04)
error: Content is protected !!