Jitada Fish : आपल्याकडे अनेक जण मांसाहारच सेवन जास्त प्रमाणात करतात. यामध्ये थंडीच्या दिवसात मासे खाण्याचे प्रमाण हे लोकांमध्ये अधिकच आह. यामध्ये वेगवेगळ्या जातीचे मासे लोक आवडीने खातात. यामध्ये जिताडा हा मासा एकदम चविष्ट मासा मानला जातो. हा मासा महानंदा, कृष्णा, गोदावरी , गंगा यासारख्या नद्यांमध्ये आढळून येतो. बंगाली भाषेमध्ये या माशाला भेक्ती या नावाने देखील ओळखले जाते. अनेक लोक या माशाची पैदास करून चांगले उत्पन्न देखील कमवतात. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांची खाडीलगत शेती असते अशा शेतात तळे खोदून या माशांची पैदास करण्यात येते. हा मासा गोड्या पाण्यात आढळत असून प्रजननासाठी खाडीलगतच्या पट्ट्यात किंवा समुद्रालयाच्या भागात स्थलांतर करतो.
शेतीनिगडीत व्यवसाय करायचा असेल तर आजच करा ‘हे’ काम
शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतीनिगडीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका खास अँपबाबत माहिती सांगणार आहोत. गुगल प्ले स्टोअवर उपलब्ध असलेले Hello Krushi हे मोबाईल अँप २ लाख शेतकरी वापरत आहेत. या अँपवर शेतकरी दुकान नावाचे एक भन्नाट फिचर असून मोफ्टमध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जाहिरात इथे करता येते. तसेच सरकारी योजना, हवामान अंदाज, शेतमालाचे बाजारभाव, पशुंची खरेदी विक्री, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, शेतकऱ्यांचे जुगाड, रोपवाटिकांची माहिती इत्यादी सर्व माहिती तुम्ही या ॲपच्या माध्यमातून घेऊ शकता तेही अगदी मोफत. त्यामुळे लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.
जिताडा संवर्धनासाठी मोठे प्रयत्न
या माशाच्या संवर्धनासाठी जगभरामध्ये मोठे प्रयत्न केले जात आहे. या माशाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे पाण्यात जसे बदल होतात त्या बदलांबरोबर तो स्वतःला जुळवून घेतो. यामुळेच तो गोड्या आणि खाऱ्या दोन्ही पाण्यात टिकून राहतो. या माशाचे वर्णन केले असता माशाचे शरीर लांबट असून डोक्यावर छोटासा खड्डा असतो त्याचबरोबर कल्ल्याच्या पुढच्या भागांमध्ये एक छोटासा काटा असतो.
हा मासा सुरुवातीला दोन-तीन वर्ष गोड्या पाण्यात राहतो त्यानंतर प्रजनन क्षमतेच्या वेळी नर आणि मादी प्रजननासाठी किनाऱ्यालगत येतात आणि त्या ठिकाणी ते अंडी घालतात. या माशाचा रंग करडा ते हिरवा असून पाठीवरील भाग काळसर असतो. प्रजननक्षम माशांची लांबी ४५ ते ६१ सेंटीमीटर असते त्याचबरोबर स्टॉकिंगसाठी आठ ते दहा सेंटिमीटरलांबीची १० ग्रॅम वजनाचे मत्स्यबीज वापरले जाते.
महाराष्ट्रात या ठिकाणी केला जातो जिताडा माशाचा व्यवसाय
जंगलामध्ये जसे वाघाला राजा म्हंटले जाते तसे पाण्यामध्ये जिताडा माश्याला अनेक लोकांच्या मते राजा म्हंटले जाते. महारष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये या माश्याचा मोठ्या प्रमाणात अनेकजण व्यवसाय करतात आणि चांगले पैसे देखील कमवत आहेत. या माशाला जिवंत पकडणे खूप अवघड आहे असे बोलले जाते कारण हा मासा खूप चपळ असून त्याचे कल्ले धारधार असून आपल्याला इजा होण्याची देखील शक्यता असते. त्याचबरोबर याला पकडताना हा मासा जाळी देखील फाडू शकतो. याला अत्यंत ताकतवर मासा म्हंटले जाते.
हा मासा खाऱ्या पाण्यामध्ये आणि गोड्या पाण्यामध्ये आढळून येतो. मात्र जास्तीत जास्त हा मासा खाऱ्या पाण्यामध्ये जास्त काळ राहतो. या माशाचे जर छोटे पिल्लू खरेदी करायचे असेल तर त्यासाठी १०० ते १५० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे हा मासा मोठा झाल्यावर त्याची किंमत देखील जास्त असते. हा मासा जर खाऱ्या पाण्यामधील असेल तर खाण्यासाठी त्याची चव देखील चांगली लागते असे बोलले जाते.
जिताडा हा मासा प्राणीभक्ष असून तो छोटे प्राणी, कवचधारी मासे हे त्याचे प्रमुख अन्न आहे. सुरुवातीला नराचे गुणधर्म दाखवतो त्यानंतर काही काळानंतर त्याचे मादीत देखील रूपांतर होते. जिताडा माशाच्या मादीचा आकार नरापेक्षा मोठा असतो. हा मासा दोन वर्षांमध्ये जवळपास तीन किलो पर्यंत वाढू शकतो याचे जास्तीत जास्त उत्पादन हे जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये होते.