जीवामृत बनवण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती? घरच्याघरी बनवा फक्त २ मिनिटांत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jivamrut Preparation in Marathi : जिवामृतामुळे जमिनीतील जिवाणूंची व नैसर्गिक गांडूळांची संख्या वाढते, जमीन सजीव व समृद्ध होते, तसेच रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठीही जिवामृताचा वापर होतो. शेतकरी घरच्याघरी जीवामृत तयार करून पिकाला देऊ शकतात. अलीकडच्या काळात अनेक शेतकरी जीवामृतचा वापर करताना दिसत आहेत. जीवामृताचा लगेच प्रभाव पडत असल्याने शेतकरी जीवामृतला पसंती देत आहेत.

साहित्य काय हवे ?

२०० लि. क्षमतेचे प्लॅस्टिक बॅरल किंवा सिमेंटची टाकी. १० किलो देशी गायीचे ताजे शेण, १० लिटर देशी गायीचे गोमूत्र, २ किलो काळा गुळ, २ किलो कोणत्याही कडधान्याचे पीठ, २ किलो वडाच्या झाडाखालील किंवा बांधावरील जिवाणू माती.

कृती (jivamrut preparation in marathi) –

जीवामृत तयार करण्यासाठी २०० लिटर क्षमतेचा प्लॅस्टिक बॅरल घ्यावा.(उपलब्ध नसल्यास २०० लि. ची सिमेंट टाकी तयार करून घ्यावी.) २०० लिटरच्या बॅरलमध्ये १७० लि. पाणी घ्यावे. त्यात १० किलो शेण, १० लि. गोमूत्र, २ किलो काळा गुळ, २ किलो कोणत्याही कडधान्याचे पीठ, २ किलो वडाच्या झाडाखालील माती हे मिश्रण जिवाणू माती असे मिश्रण बॅरलमध्ये टाकून मिसळावे. डावीकडून उजवीकडे दररोज १० ते १५ मिनिटे ढवळावे. दिवसातून २ ते ३ वेळा बांबुकाठीने घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने ढवळावे. ७ दिवसांत पिकांना देण्यासाठी जिवामृत तयार होते. १ एकरसाठी २०० लिटर जिवामृत पुरेेसे होते. जास्त क्षेत्र असल्यास बॅरलची संख्या वाढवावी अथवा १००० लिटरच्या टाक्या तयार करून वरीलप्रमाणे पाचपट करून वापरावे.

वापरण्याची पद्धत –

१) जमिनीत ओलावा असताना कडूनिंबाच्या डहाळीने पिकांच्या ओळीत जमिनीवर शिपंडावे. २) टोकन केलेल्या पिकांना उदा. कापूस, मिरची, केळी, पपई यांच्या खोडाजवळ (बुंध्याजवळ) डब्याने अथवा मगाने २५० ते ५०० मि.लि प्रतिझाड द्यावे. ३) पिकांना पाणी देत असताना मुख्य चारी (दांडा) मध्ये पाणी देणार्‍याने मगाने अथवा डब्याने बारीक धार लावून पाण्यासोबत सरीतून देता येते. ४) जिवामृत घट्ट कणकेसारखे तयार करून गोणपाटात भरून पाण्याच्या पाईपाखाली ठेवून दिल्यास पाण्याबरोबरच जिवामृत पिकांना दिले जाते. ५) जिवामृताची निवळी फवारणीसाठी देखील वापरतात.

फायदे काय आहेत –

जमिनीत सर्व पिकांना लागणारा अन्नाचा साठा अमर्याद आहे. पण तो पिकांना उपलब्ध स्वरूपात नाही. जिवाणूंच्या माध्यमातून ते पिकांना उपलब्ध होत असतो. मात्र रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके यांच्या वापराने जिवाणू नष्ट झालेले आहेत. जिवामृत वापराने या जिवाणूंची संख्या अब्जावधीने वाढते. पिकांना अन्नद्रव्ये मिळाल्याने वाढ जोमदार होते. जमीन सजीव व समृद्ध होते. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. पिक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते. पिकांचे बीज, धान्य, दाणे हे परिपूर्ण विकसित होतात. परिणामी चांगले उत्पन्न मिळते. हे धान्य व वैरण खाऊन शेतकरी व गुरांचे आरोग्य चांगले दिसून आले. जिवामृत समृद्ध जमिनीतील पिके व कीड रोगांना समर्थपणे प्रतिकार करताना दिसून येतात. जमिनीवर पडलेले सेंद्रिय पदार्थाचे विघटन लवकर होते. जिवामृत दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी माती कोरून बघितल्यास नैसर्गिक गांडूळाची असंख्य पिल्ले तयार झालेली दिसतात. पिवळी पडलेल्या पिकांची अवस्था अल्पावधीच सुधारते.

error: Content is protected !!