Jowar Cultivation : राज्यातील ज्वारी लागवडीत घट; प्रमुख राज्यांमध्येही क्षेत्र घटले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षी आतापर्यंत देशातील ज्वारी लागवड (Jowar Cultivation) काहीशी घट पाहायला मिळत असून, यंदा 16.73 लाख हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 18.21 लाख हेक्टरवर (Jowar Cultivation) नोंदवली गेली होती. यामध्ये प्रमुख ज्वारी उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात ज्वारीची लागवड 9.88 लाख हेक्टरवरून 9.62 लाख हेक्टरपर्यंत घसरली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, देशातील ज्वारी लागवडीखालील (Jowar Cultivation) क्षेत्रामधील घटीचे प्रमुख कारण हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये लागवड क्षेत्रात झालेली घट असल्याचे सांगितले जात आहे. ज्वारीची प्रामुख्याने खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात लागवड होते. यावर्षी देशातील एकूण लागवडीखालील क्षेत्रात 1.48 लाख हेक्टर इतकी घट नोंदवली गेली आहे. यावर्षी ज्वारीची लागवड ही 18.21 लाख हेक्टरहुन 16.73 लाख हेक्टरपर्यंत खाली घसरली आहे. कर्नाटकमध्ये यावर्षी 5.48 लाख हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 4.54 लाख हेक्टर इतकी नोंदवली गेली होती. तामिळनाडूमध्ये ज्वारी लागवडीखाली क्षेत्र 1.81 लाख हेक्टरहून 1.89 लाख हेक्टरपर्यंत खाली घसरले आहे. गुजरातमध्ये यावर्षी रब्बी ज्वारीचे क्षेत्र 36 हजार हेक्टरवरून 15 हजार हेक्टरपर्यंत खाली घसरले आहे. याशिवाय अन्य राज्यांमध्ये मागील वर्षी याच कालावधीत 93 हजार हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली होती. ज्यात यावर्षी 68 हजार हेक्टरपर्यंत घसरण झाली आहे.

महाराष्ट्रात होते सर्वाधिक लागवड (Jowar Cultivation In India)

महाराष्ट्रात देशातील एकूण ज्वारी उत्पादनाच्या तुलनेत 54 टक्क्यांहून अधिक उत्पादन होत असून, प्रामुख्याने 22 जिल्हे ज्वारीचे उत्पादन घेतात. यात उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, परभणी, कोल्हापूर, अमरावती आणि अहमदनगर हे महत्त्वाचे उत्पादक जिल्हे आहेत. देशातील एकूण ज्वारी उत्पादनापैकी 18.51 टक्के उत्पादनासह कर्नाटक हे दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर मध्यप्रदेशात असून, त्याठिकाणी देशातील एकूण उत्पादनापैकी 7.87 टक्के ज्वारीचे उत्पादन होते.

error: Content is protected !!