Jumbo Potato : अबब… दोन किलोचा एकच बटाटा; शेतकऱ्याच्या बटाटा शेतीची सर्वदूर चर्चा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बटाटा (Jumbo Potato) पिकाची शेती मोठया प्रमाणात केली जाते. बटाटा हे कंदवर्गीय फळभाजी पीक असून, ते थंड हवामानात अर्थात रब्बी हंगामात उत्तमरीत्या घेता येते. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील पट्टा बटाटा पिकासाठी विशेष प्रसिद्ध आहे. तुम्ही बाजारात बटाटा खरेदी करताना बऱ्याचदा निरीक्षण केले असेल की बटाटा खरेदी केल्यानंतर एक किलोत 10 ते 12 बटाटे हमखास मिळतात. मात्र आता एका शेतकऱ्याने चक्क दोन किलोचा एक बटाटा (Jumbo Potato) आपल्या शेतात पिकवला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

पिढ्यानपिढ्या बटाटा शेती (Jumbo Potato Farming)

सध्याच्या घडीला बटाटा काढणी हंगाम जोरात सुरु असून, अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळत आहे. अशातच देशातील सर्वाधिक बटाटा उत्पादित करणारा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या उत्तर प्रदेशातील फर्रूखाबादमध्ये एक चमत्कारिक अनुभव समोर आला आहे. पतौजा गावचे शेतकरी मेराज हुसैन हे सध्या आपल्या शेतातील बटाटा काढणी करत आहे. अशातच त्यांच्या शेतात दोन किलोचा एक बटाटा (Jumbo Potato) मिळाला आहे. मेराज हुसैन सांगतात, आपल्या अनेक पिढ्यांपासून बटाटा शेती केली जात आहे. मात्र, आजपर्यंत इतका मोठा बटाटा कधीच पाहिलेला नाही. ना ही मार्केटमध्ये किंवा ना कोण्या शेतकऱ्याकडे असा बटाटा कधी आढळला. त्यामुळे आपण स्वतः याबाबत अचंबित आहोत.

पाहण्यासाठी अनेकांची झुंबड

शेतकरी मेराज हुसैन यांनी म्हटले आहे की, आपण पारंपरिक पद्धतीने पिढीजात बटाटा पिकाची शेती करतो. रासायनिक खतांसह जैविक खतांचाही शेतात वापर करतो. आपल्याला यावेळी बटाटा पिकाचे चांगले उत्पादन देखील मिळाले आहे. मात्र, यंदा आपल्या जमिनीत दोन किलोचा एकच बटाटा (Jumbo Potato) पिकला आहे. यापूर्वी आपण इतका मोठा बटाटा कधीही पाहिलेला नाही. दोन किलोहून अधिक वजन असणाऱ्या या बटाट्याबाबत अनेक लोक चौकशी करत आहे. अनेक बटाटा उत्पादक शेतकरी याबाबत विचारणा करत आहे. तसेच हा जम्बो बटाटा पाहण्यासाठी अनेक जण आपल्याकडे गर्दी करत आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.

आशियातील सर्वात मोठे मार्केट

उत्तरप्रदेशातील फर्रूखाबाद जिल्हा बटाटा उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बटाटा बाजार समिती म्हणून फर्रूखाबाद बाजार समितीची ओळख आहे. या ठिकाणी देशातच नाही तर दुसऱ्या देशांमध्ये देखील लाखो क्विंटल बटाटा निर्यात केली जाते. अशातच आता जिल्ह्यातील मेराज हुसैन या शेतकऱ्याने दोन किलो वजनाचा एकच बटाटा (Jumbo Potato) पिकवल्याने त्यांचे सर्व स्तरारून कौतुक केले जात आहे. तसेच हा बटाटा पाहण्यासाठी शेतकरी मेराज यांच्याकडे लोकांची मोठी गर्दी होत आहे.

error: Content is protected !!