Jwari Bajar Bhav : सोलापूर जिल्ह्यात ज्वारीला उच्चांकी दर; पहा किती मिळतोय भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ज्वारीच्या बाजारभावात वर्षभरात मोठी वाढ झाली असून, राज्याचे ज्वारीचे कोठार (Jwari Bajar Bhav) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सध्या विक्रमी दर (Jwari Bajar Bhav) मिळत आहे. मंगळवारी (ता.5) सोलापूर बाजार समितीत मालदांडी ज्वारीला विक्रमी 5820 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जिल्ह्यातील करमाळा बाजार समितीत 6051 रुपये प्रति क्विंटल, तर बार्शी बाजार समितीत 6500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, सोलापूर बाजार समितीत (Jwari Bajar Bhav) 2019 च्या डिसेंबर महिन्यात 3500 रुपये प्रति क्विंटल तर 2020 मधील डिसेंबर महिन्यातही याच पातळीवर दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. 2021 मधील डिसेंबर महिन्यात मात्र त्यात घट होऊन ते 2400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आल्याचे पाहायला मिळाले. 2022 मधील डिसेंबर महिन्यात त्यात पुन्हा वाढ होऊन, ते 3800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले. तर सध्या 2023 मधील डिसेंबर महिन्यात सोलापूर बाजार समितीतील ज्वारीचे दर सहा हजार रुपयांच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. अर्थात वर्षभरात ज्वारीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील दर (Jwari Bajar Bhav In Maharashtra)

सोलापूर बाजार समितीत मंगळवारी (ता.5) मालदांडी ज्वारीची 9 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5820 ते किमान 5800 तर सरासरी 5820 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. करमाळा बाजार समितीतीत 115 क्विंटल ज्वारीची आवक झाली असून, कमाल 6051 ते किमान 3100 तर सरासरी 5200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. बार्शी बाजार समितीत 172 क्विंटलची आवक झाली असून, कमाल 6500 ते किमान 4500 तर सरासरी 5200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मागणीच्या तुलनेत बाजार समित्यांमध्ये अल्प पुरवठा होत असल्याने दरात ही वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांनी ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!