हॅलो कृषी ऑनलाईन : मागील जानेवारी महिन्यात ज्वारीचे दर (Jwari Bajar Bhav) काहीसे घसरले होते. मात्र, सध्या त्यात सुधारणा झालेली पाहायला मिळत आहे. आज (ता.17) पुणे बाजार समितीत ज्वारीची 661 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5800 ते किमान 5000 रुपये तर सरासरी 5400 रुपये प्रति दर मिळाला आहे. मागील महिन्यात राज्यातिल अनेक बाजार समित्यांमध्ये ज्वारीचे दर 2500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले होते. मात्र, सध्या हिंगोली, संभाजीनगर या बाजार समित्यांमधील ज्वारीचे दर (Jwari Bajar Bhav) 3000 रुपये प्रति क्विंटलच्या वरती पोहचले आहेत.
सर्वाधिक दर कुठे? (Jwari Bajar Bhav Today 17 Feb 2024)
अहमदनगर जिल्ह्यातील राहूरी-वांबोरी बाजार समितीत (Jwari Bajar Bhav) आज 52 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4242 ते किमान 1051 रुपये तर सरासरी 3300 रुपये प्रति क्विंटल, सातारा जिल्ह्यातील वडूज बाजार समितीत आज 150 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4000 ते किमान 3800 रुपये तर सरासरी 3900 रुपये प्रति क्विंटल, लातूर जिल्ह्यातिल औराद शहाजानी बाजार समितीत आज 16 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3951 ते किमान 2900 रुपये तर सरासरी 33425 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजार समितीत आज 13 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3835 ते किमान 3835 रुपये तर सरासरी 3835 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील (दुधनी) बाजार समितीत आज 71 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3700 ते किमान 2175 रुपये तर सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज 173 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3620 ते किमान 2100 रुपये तर सरासरी 2860 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत आज 43 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3600 ते किमान 3400 रुपये तर सरासरी 3550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
सांगली बाजार समितीत आज 185 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3500 ते किमान 3180 रुपये तर सरासरी 3340 रुपये प्रति क्विंटल, तुळजापूर (धाराशिव) बाजार समितीत आज 70 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3500 ते किमान 2500 रुपये तर सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटल, जालना बाजार समितीत आज 1979 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3491 ते किमान 1800 रुपये तर सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटल, गेवराई बाजार समितीत आज 31 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3419 ते किमान 2000 रुपये तर सरासरी 2700 रुपये प्रति क्विंटल, जळगाव बाजार समितीत आज 35 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3400 ते किमान 2400 रुपये तर सरासरी 3285 रुपये प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत आज 25 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3235 ते किमान 2200 रुपये तर सरासरी 2717 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
दर स्थिर राहणार
दरम्यान, यावर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारीच्या पेरणीत काही भागांमध्ये काहीशी वाढ नोंदवली गेली. ज्यामुळे पेरणीची आकडेवारी पाहता मागील महिन्यात ज्वारीचे दर (Jwari Bajar Bhav) काहीसे नरमले होते. मात्र, सध्या दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ज्वारीच्या काढणीला सुरुवात झाली आहे. अशातच आता बाजार समित्यांमध्ये नवीन ज्वारीची आवक वाढेल. मात्र काही दिवस ज्वारीचे स्थिर राहणार असून, आगामी काळात त्यामध्ये वाढीची शक्यता नाकारता येत नाही. असे जाणकारांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात ज्वारीचे दर वाढल्यास त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.