Jwari Bajar Bhav : ज्वारीच्या दरात मोठी घसरण; पहा.. आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील 10 ते 12 दिवसांमध्ये ज्वारीच्या दरामध्ये (Jwari Bajar Bhav) मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात ज्वारीला सरासरी ५००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत होता. मात्र, सध्या ज्वारीचा दर 2500 ते 4350 रुपयांपर्यंत खाली आला आहे. आज सांगली बाजार समितीत शाळू ज्वारीला राज्यातील सर्वाधिक कमाल 5200 ते किमान 3500 रुपये तर सरासरी 4350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. गेल्या आठवडाभरात राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये ज्वारीच्या दरात (Jwari Bajar Bhav) ६०० ते ७०० रुपयांनी घसरण नोंदवली गेली आहे.

आजचे राज्यातील बाजारभाव (Jwari Bajar Bhav Today 21 March 2024)

जळगाव बाजार समितीत (Jwari Bajar Bhav) आज 720 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3100 ते किमान 2525 रुपये तर सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल, चाळीसगाव बाजार समितीत आज 1200 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2251 ते किमान 1961 रुपये तर सरासरी 2170 रुपये प्रति क्विंटल, अमळनेर बाजार समितीत आज 1700 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2361 ते किमान 2000 रुपये तर सरासरी 2361 रुपये प्रति क्विंटल, धुळे बाजार समितीत आज 395 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2245 ते किमान 1920 रुपये तर सरासरी 2175 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

करमाळा बाजार समितीत आज 385 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4900 ते किमान 3000 रुपये तर सरासरी 4000 रुपये प्रति क्विंटल, मंगळवेढा बाजार समितीत आज 148 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3800 ते किमान 2450 रुपये तर सरासरी 3700 रुपये प्रति क्विंटल, मुरुम बाजार समितीत आज 309 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4351 ते किमान 2601 रुपये तर सरासरी 3476 रुपये प्रति क्विंटल, तुळजापूर बाजार समितीत आज 150 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4025 ते किमान 3000 रुपये तर सरासरी 3850 रुपये प्रति क्विंटल, माजलगाव बाजार समितीत आज 185 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3116 ते किमान 1801 रुपये तर सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

हमीभावापेक्षा मिळतोय कमी दर

यावर्षीचा खरीप हंगामात शेतकऱ्यांना हाती काहीच मिळाले नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीची पेरणी केली. विशेष म्हणजे गेल्या तीन-चार महिन्यात टप्प्याटप्प्याने झालेला पाऊस ज्वारी पिकाच्या पथ्यावर पडला. मात्र, आता ऐन काढणी झाल्यानंतर बाजारात ज्वारी मोठ्या प्रमाणात दाखल होताच, ज्वारी दरास (Jwari Bajar Bhav) उतरती कळा लागली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने 2023​-24 या वर्षासाठी 3225 ​रुपये क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. त्या दृष्टीने विचार करता, राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये ज्वारीला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे आता सोयाबीन, कांदा, कापूस उत्पादकांनंतर ज्वारी उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडला आहे.

error: Content is protected !!