Jwari Bajar Bhav : ज्वारीच्या दरात मोठी घसरण; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या ज्वारीच्या दरात (Jwari Bajar Bhav) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने हिंगोली बाजार समितीत ज्वारी दरात मोठी घसरण झाली असून, आज त्या ठिकाणी 5 क्विंटल आवक झाली आहे. ज्वारीला हिंगोली बाजार समितीत कमाल 2905 ते किमान 1800 तर सरासरी 2352 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मागील आठवड्यात हिंगोली बाजार समितीत ज्वारीला कमाल 3400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर (Jwari Bajar Bhav) मिळत होता.

राज्यातील आजचे ज्वारीचे दर (Jwari Bajar Bhav Today 9 Jan 2024)

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज ज्वारीची 7 क्विंटल (Jwari Bajar Bhav) आवक झाली असून, कमाल 2600 ते किमान 2200 तर सरासरी 2333 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज ज्वारीची 3 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2700 ते किमान 2500 तर सरासरी 2600 रुपये प्रति क्विंटल, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर बाजार समितीत आज ज्वारीची 65 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3700 ते किमान 3100 तर सरासरी 3500 रुपये प्रति क्विंटल, बीड बाजार समितीत आज ज्वारीची 18 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3300 ते किमान 2150 तर सरासरी 2731 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

चाळीसगाव बाजार समितीत आज ज्वारीची 4 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2651 ते किमान 2340 तर सरासरी 2525 रुपये प्रति क्विंटल, चोपडा बाजार समितीत आज ज्वारीची 30 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2871 ते किमान 1800 तर सरासरी 2871 रुपये प्रति क्विंटल, आष्टी (जालना) बाजार समितीत आज ज्वारीची 1 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2250 ते किमान 2250 तर सरासरी 2250 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत आज ज्वारीची 662 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6500 ते किमान 5800 तर सरासरी 6150 रुपये प्रति क्विंटल, मुंबई बाजार समितीत आज ज्वारीची 1176 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7000 ते किमान 3000 तर सरासरी 5300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

पेरणीत काहीशी वाढ

दरम्यान, मागील वर्षी रब्बी हंगामात पाऊसच न झाल्याने राज्यातील रब्बी ज्वारीच्या पेरणीमध्ये मोठी घट पाहायला मिळाली होती. मात्र आता यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी राज्यात झालेल्या पावसामुळे ज्वारीच्या पेरणीत काही भागांमध्ये काहीशी वाढ नोंदवली गेली आहे. परिणामस्वरूप, दोन महिन्यापूर्वी असलेले प्रति क्विंटल 4500 ते 5000 रुपये दर सध्या आठवडाभरापासून 2500 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

error: Content is protected !!