Jwari farming : ज्वारीच्या देठावर झालंय ‘हे’ संशोधन; शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस आणि ज्वारी (Jwari farming) यांच्या चिपाडाचा प्रामुख्याने इंधन म्हणून वापर केला जातो. मात्र आता कानपुर येथील राष्ट्रीय साखर संशोधन संस्थेने ज्वारीच्या देठापासून मध निर्मिती तर ज्वारीच्या चिपाडापासून दोन खाद्यपदार्थ बनवण्याचे अनोखे संशोधन केले आहे. संस्थेच्या संशोधकांना आहारातील डाइटरी फाइबर तयार करण्यात यश मिळाले आहे. ज्वारीपासून (Jwari farming) मिळालेल्या या डाइटरी फाइबरची व्हॅनिलिन अर्थात पांढऱ्या पावडर स्वरूपात निर्मिती देखील केली जात आहे.

राष्ट्रीय साखर संशोधन संस्थेचे संचालक प्रोफेसर नरेंद्र मोहन यांनी म्हटले आहे की, संस्थेच्या तज्ज्ञांनी ज्वारीच्या (Jwari farming) विविध प्रजातींपासून केवळ अल्कोहोलच नाही तर साखरेला पर्याय म्हणून ज्वारीच्या देठाच्या रसातून मधासारखा पदार्थ मिळवण्यासाठी संशोधन केले आहे. ज्वारीच्या या सिरपमध्ये मधासारखे गुणधर्म असून, समान कॅलरीज आढळून आल्या आहेत. तर तिसरे उत्पादन म्हणून संस्थेने ज्वारीच्या चिपाडापासून आहारातील फायबर तयार केले जात आहे. या संशोधनासाठी उत्तर प्रदेशातील ज्वारीच्या 11 प्रजातींवर गेल्या 3 वर्षांपासून संशोधन करण्यात येत होते. त्यापैकी पाच प्रजातींच्या देठात मिळणाऱ्या रसातून मधासारखे सरबत आणि चिपाडापासून आहारातील फायबर आणि व्हॅलिनिन मिळू शकते. संस्थेचे संशोधनाचे काम पूर्ण होताच ते बाजारात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असेही प्रोफेसर नरेंद्र मोहन यांनी म्हटले आहे.

आरोग्यविषयक फायदे (Jwari farming research on sorghum crop)

कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये फायबर असणे हे मानवी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. फळे, भाजीपाला, काजू आणि डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्या खाद्यपदार्थांमध्ये फायबर नसते. अशा खाद्यपदार्थांचा आहारात नियमित समावेश असेल तर पोट अधिक काळापर्यंत भरलेले असते. त्यामुळे फायबरयुक्त आहार घेतल्याने पोटाचे आरोग्य उत्तम राहून, लठ्ठपणा, कफ, बवासीर आणि हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी असतो. फायबरयुक्त आहारामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांची साखर संतुलित राहते. त्यामुळे आरोग्यवर्धक बाबींचा विचार करता ज्वारीवरील हे संशोधन नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या अर्थार्जनाचा मार्ग

इतकेच नाही तर ज्वारीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी डाइटरी फाइबर हे केवळ उसाच्या चिपाडापासून बनवले जात होते. मात्र आता ज्वारीवरील या संशोधनामुळे ज्वारी पिकाच्या घटकांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही यातून चांगले उत्पन्न मिळणार आहे. सध्या शेतकरी आपल्या ज्वारीच्या देठाचा जनावरांचा चारा म्हणून वापर करतात. मात्र आता या संशोधनामुळे ज्वारीच्या मुळांपासून शेंड्यापर्यंत असलेले ताट (देठ) हे साखरेच्या सिरपनिर्मितीसाठी वापरले जाणार आहे. ज्वारीचे पाने देखील (चिपाड) फायबर निर्मितीसाठी वापरली जाणार आहे. यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना ऊस पिकाप्रमाणे अर्थार्जनाचा एक नवीन मार्ग तयार होणार असून, त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

error: Content is protected !!