Jwari Food Processing : ज्वारीपासून सुरु करा ‘हा’ व्यवसाय; प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मोठी संधी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात ज्वारी (Jwari Food Processing) लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, राज्यातील कोकण विभाग वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन होते. मात्र, आता शेतकऱ्यांनी पिकांचे उत्पादन घेण्याचे प्रक्रिया उद्योगात उतरण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आपल्या देशात सरकारकडून देखील मिलेट्स अर्थात तृणधान्याचा लागवडीसह त्यावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील तुमच्या परिसरात ज्वारीआधारित प्रक्रिया (Jwari Food Processing) उभारून मोठी कमाई करू शकता. याच पार्श्वभूमीवर आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रात पूरक वातावरण (Jwari Food Processing Business)

आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्वारी उत्पादनात भारताचा चौथा क्रमांक असून, जगातील एकूण ज्वारी उत्पादनापैकी १८ टक्के उत्पादन भारतात होते. तर देशाचा विचार करता, महाराष्ट्र हे राज्य ज्वारी उत्पादनात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यामुळे राज्यात ज्वारी आधारित प्रक्रिया उद्योग (Jwari Food Processing) उभारण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या रेडिमेड अन्नपदार्थ खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे, ज्यामुळे तुम्हाला या व्यवसायातून मोठा नफा मिळवता येऊ शकतो.

कोणकोणते पदार्थ बनवले जाऊ शकतात?

1. वाळवणाचे पदार्थ : शहरी भागात महिला 9 ते 6 अशा पूर्ण वेळ कामात गुंतलेल्या असतात. ज्यामुळे त्यांना वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी फारसा वेळ नसतो. हीच गरज ओळखून तुम्ही ज्वारीच्या पापड्या, ज्वारीच्या कुरडया आणि अन्य वाळवणाच्या पदार्थांचा तुमचा एक ब्रँड तयार करू शकतात.

2. ज्वारीपासून पोहे निर्मिती : हल्ली शहरातच नाही तर ग्रामीण भागातही सकस आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळे न्याहारीला अर्थात नाश्त्याला ज्वारीचे पोहे चांगलेच भाव खातात. कारण पौष्टिकतेच्या पातळीवर पोह्यांना नेहमीच प्रथम स्थान दिले जाते. त्यामुळे तुम्ही ज्वारीपासून पोहेनिर्मिती करून आपला एक चांगला ब्रँड बनवू शकतात.

3. ज्वारीचा रवा : ज्वारीच्या रव्यात असलेली पौष्टिकता पाहता त्याचा वापर स्वयंपाक घरात मोठ्या प्रमाणात होतो. इतकेच नाही तर उपमा, दलिया, डोसा, इडली यासह विविध पाककृतींमध्ये तो वापरला जातो. याशिवाय काही बेकिंग पदार्थांमध्ये देखील त्याचा वापर होतो. त्यामुळे तुम्ही ज्वारीपासून रवा निर्मिती करू शकतात. हा देखील तुमचा एक उत्तम ब्रँड तयार होईल.

4. ज्वारीची बिस्किटे : तुम्ही ज्वारीच्या पिठात नाचणीचे पीठ, सोयाबिनचे पीठ, मिल्क पावडर घालून साखर विरहित क्रिमसह, प्रथिनयुक्त, उच्च तंतुमय आणि कमी कॅलरीज असणारी उत्तम प्रतीची बिस्किटे तयार करू शकतात. अर्थात हा देखील ज्वारीपासून ब्रँड तयार होईल.

5. ज्वारीच्या लाह्या : चिवडा हा सर्वांचाच फेवरीट असतो. त्यामुळे ज्वारीच्या निर्मिती करुन देखील तुमची मोठी कामे होऊ शकते. या लाहयांचा वापर दैनंदिन स्वरूपात मोठ्या प्रमाणात होतो.

error: Content is protected !!